रोहित्र लावून देण्यास विद्युत मंडळाची "ना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:23+5:302021-07-15T04:20:23+5:30

घनश्याम नवघडे नागभीड : शेतातील कृषिपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले तरी ...

Vidyut Mandal's "No" to install Rohitra | रोहित्र लावून देण्यास विद्युत मंडळाची "ना"

रोहित्र लावून देण्यास विद्युत मंडळाची "ना"

Next

घनश्याम नवघडे

नागभीड : शेतातील कृषिपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले तरी ते लावून देण्यात विद्युत मंडळाची चालढकल सुरू आहे. या प्रकाराने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज जोडण्या देण्यात आल्या. मात्र, लावण्यात आलेले काही रोहित्र निकृष्ट निघाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे वर्षभरातच रोहित्र बंद पडले. रोहित्र बंद पडल्यामुळे वीज पुरवठाही बंद झाला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणीचे रोहित्र बंद पडले. त्या शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे तक्रार केल्यानंतर दुरूस्तीसाठी म्हणून ते वीज मंडळाकडून रोहित्र काढून घेण्यात आले. मात्र, या बाबीस आता सहा ते सात महिन्यांचा कालावधी होत असला तरी ते अद्याप लावून देण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार अशा बंद असलेल्या व महावितरण कंपनीने दुरूस्तीसाठी काढून घेतलेल्या रोहित्रांची संख्या २० च्या घरात असल्याची माहिती आहे.

बॉक्स

आता स्वतंत्र रोहित्र

माहितीनुसार नागभीड तालुक्यात २००० ते मार्च २०१८ पर्यंत २ हजार २०३ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रोहित्र सामूहिक म्हणजे कमीत कमी १० शेतकऱ्यांना देण्यात येत होते. पण आता स्वतंत्र रोहित्र देण्यात येत आहे. नागभीड तालुक्यात मुख्य पीक धानाचे आहे. सद्यस्थितीत पाऊस योग्य पडत असला तरी तो केव्हा आपला इंगा दाखवेल, याचा भरवसा नाही. महावितरण कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे रोहित्र दुरूस्तीसाठी काढले, त्यांचे रोहित्र त्वरित लावून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कोट

काही रोहित्र दुरूस्तीसाठी काढून आणण्यात आले आहेत. मात्र, नियमानुसार थकीत असलेले बिल अदा केल्याशिवाय रोहित्र लावून देता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले त्या शेतकऱ्यांचे रोहित्र लावून देण्यात आली आहेत.

- आर. यु. कारगावकर

उपविभागीय अभियंता, नागभीड

140721\img-20210713-wa0019.jpg

रोहित्राशिवाय विद्युत खांब

Web Title: Vidyut Mandal's "No" to install Rohitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.