लोकशाहीसाठी जागरुक मतदारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:33 PM2018-10-06T22:33:01+5:302018-10-06T22:33:18+5:30

लोकशाही टिकवायची असेल तर देशामध्ये जागरूक मतदारांची गरज आहे. याकरिता मतदार नोंदणी करून संविधानाने दिलेला हक्क निर्भडपणे बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तुकूम व राज्य निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

Vigilants need to be aware of democracy | लोकशाहीसाठी जागरुक मतदारांची गरज

लोकशाहीसाठी जागरुक मतदारांची गरज

Next
ठळक मुद्देकुणाल खेमणार : कला, वाणिज्य महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकशाही टिकवायची असेल तर देशामध्ये जागरूक मतदारांची गरज आहे. याकरिता मतदार नोंदणी करून संविधानाने दिलेला हक्क निर्भडपणे बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तुकूम व राज्य निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.बी. मोहीतकर तर प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी एस.जी. समर्थ, तहसीलदार संतोष खांडरे, नायब तहसीलदार सतीश साळवे, नोडल अधिकारी प्रा.माधव गुरनुले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी खेमणार म्हणाले, सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी जबाबदार मतदार म्हणून आपली भूमिका व कर्तव्य बजावणे अत्यावश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरिता जागृत मतदार म्हणून युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ती पार पाडावी व राष्ट्रीय कार्यात मतदार म्हणून सक्रीय सहभाग दर्शवावा. उपजिल्हाधिकारी समर्थ म्हणाले, विशेष मोहिमेअंतर्गत मतदार जागृती करणे व मतदार म्हणून नाव नोंदविणे आवश्यक आहे. येत्या निवडणुकीत मतदार प्रक्रिया पारदर्शक करण्याचे दृष्टीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅडचा वापर केला जाणार आहे.
प्राचार्य डॉ.मोहितकर म्हणाले, मतदार नोंदणी या राष्ट्रीय उपक्रमात सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. देशाचा विकास हा आदर्श मतदारांच्या हातात आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बी.एस्सी. भाग-१ ची विद्यार्थिनी श्रुती हजारे या विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी खेमनार यांच्यातर्फे सत्कार मतदार नोंदणी करण्यात आली.
प्रास्ताविक प्रा.माधव गुरनुले, संचालन डॉ.पी.एम. तेलखडे यांनी केले. डॉ. आर. यु. मुरमाडे यांनी आभार मानले.

Web Title: Vigilants need to be aware of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.