विलास भोयर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:10+5:302021-04-05T04:25:10+5:30
गावाच्या विकासासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक असते. सरपंच, पदाधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांनी योग्य मेळ साधला की गावाचा चेहरामोहरा बदलू ...
गावाच्या विकासासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक असते. सरपंच, पदाधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांनी योग्य मेळ साधला की गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. मूल तालुक्यातील मारोडा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांनी अतिशय समन्वयाने गावाचा विकास साधला. त्याच्या कार्याची दखल सरकारने घेतली. त्यांना नुकताच राज्य शासनाने आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार घोषित केला. विलास भोयर यांचा आदर्श घेत ग्रामसेवकांनी गावविकासाचे नियोजन करावे, असे प्रतिपादन गोंडपिपरीचे निरीक्षण अधिकारी संघपाल मेश्राम यांनी केले.
गोंडपिपरी येथील निसर्ग सखा संस्थेच्या वतीने गोंडपिपरीचे भूमिपुत्र व मारोड्याचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोंडपिपरीचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले, सत्कारमूर्ती विलास भोयर, संदीप रायपूरे, चेकघडोलीचे संरपच पोचमल्लू उलेंदला यांची उपस्थिती होती.
मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांना नुकताच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन आशिक सुखदेवे यांनी केले तर आकाश चौधरी यांनी आभार मानले.