वीज ग्राहकांच्या समस्या निवारणार्थ एक गाव-एक दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:24+5:302021-01-22T04:25:24+5:30
यावेळी आ. सुभाष धोटे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. गतवर्षी राबविलेल्या मोहिमेत ६८ ...
यावेळी आ. सुभाष धोटे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. गतवर्षी राबविलेल्या मोहिमेत ६८ गावांमध्ये एकत्रित ९६८ तक्रारींचे निवारण झाले होते. महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम येत्या काळात अधिक गतिशील करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी दिली. ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीज बिल व मीटर रीडिंगसंदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण केले जात आहे. या मोहिमेत ग्रामस्थांशी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी संवाद साधून मोबाइल ॲप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबत प्रबोधन करत आहेत. चंद्रपूर मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्या संध्या चिवंडे, चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता परिश्रम घेत आहेत. ३१ जानेवारीपर्यंत २०२१ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
या समस्यांचा होणारा निपटारा
महावितरणकडून तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग, डिस्ट्रीब्युशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट व गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीज मीटर बदलणे, बिल दुरुस्ती, वीज मीटर तपासणी, नावात बदल, वीज देयके मिळत नसल्यास उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे होणार आहेत.