‘ त्या’ गावाची योग्य ठिकाणी संलग्नता करण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:53+5:302020-12-29T04:27:53+5:30
तालुक्यातील नांदगाव व जैतापूर या गावाची पोलीस स्टेशन हद्द राजूरा येथे त्यांची गडचांदूर पोलीस स्टेशन हद्द करणे, सिंगार पठार ...
तालुक्यातील नांदगाव व जैतापूर या गावाची पोलीस स्टेशन हद्द राजूरा येथे त्यांची गडचांदूर पोलीस स्टेशन हद्द करणे, सिंगार पठार हे गाव कोरपना तालुका मुख्यालय पासून अगदी जवळ आहे. मात्र त्या गावाची ग्रामपंचायत लांबोरी, तलाठी साजा येल्लापूर, तालुका जिवती तेथील नागरिकांना हे तिन्ही स्थळ गैरसोयीचे आहे. त्यामुळे त्यांना येरगव्हण ग्रामपंचायत व तलाठी साजा शी जोडून कोरपना तालुक्याला जोडण्यात यावे
मानोली खुर्द, बैलमपुर, नोकारी, वरझडी ही गावे राजुरा तालुक्यात येतात. परंतु , त्या गावांना गडचांदूर अधिक जवळ व पोलीस स्टेशन हद्द, पोस्ट , वनविभाग क्षेत्र हेच असल्याने कोरपना तालुक्यात समावेश करण्यात यावा. अमल नाला सिंचन प्रकल्प वास्तविकता गडचांदूर च्या जवळ आहे. त्या प्रकल्पाचा कारभार येथूनच पहायला जातो. त्यामुळे तो प्रकल्प कोरपना तालुका हद्दीत समाविष्ट करण्यात यावा. कारगाव बु हे गाव कोरपना तालुक्यात असले तरी त्याची ग्रामपंचायत धनकदेवी येथे आहे. त्यामुळे या गावाला धानोली ग्रामपंचायतला जोडण्यात यावे. नवेगाव ( तळोधी) हे गाव कोरपना तालुक्यात समाविष्ट आहे. परंतु त्याची ग्रामपंचायत राजुरा तालुक्यातील वरोडा येथे त्यामुळे त्या गावाचा तळोधी ग्रामपंचायत मध्ये समावेश करावा. तसेच अनेक गावांना महसूल गाव दर्जा नाही. त्यांना दर्जा देण्यात यावा. जेणेकरून प्रशासकीय कामात सुसूत्रता येऊन या गावाचा विकास साधला जाईल. नागरिकांची होणारी परवड ही थाबेल.