उपसरपंचाच्या स्वागतासाठी एकवटले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:36 AM2017-12-22T00:36:36+5:302017-12-22T00:36:48+5:30

खुले आम दारूविक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाची झोप उडवून दिल्याचा प्रकार चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे घडला होता. याप्रकरणी उपसरपंचाला जबाबदार धरून त्यांना प्रशासनाने ५६ दिवसांची जिल्हाबंदी केली होती.

The village singled out for the signing of the panchayat | उपसरपंचाच्या स्वागतासाठी एकवटले गाव

उपसरपंचाच्या स्वागतासाठी एकवटले गाव

googlenewsNext
ठळक मुद्देवहानगाव दारूविक्री प्रकरण : जिल्हाबंदीनंतर कोल्हे परतले

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : खुले आम दारूविक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाची झोप उडवून दिल्याचा प्रकार चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे घडला होता. याप्रकरणी उपसरपंचाला जबाबदार धरून त्यांना प्रशासनाने ५६ दिवसांची जिल्हाबंदी केली होती. अखेर ५६ दिवसांचा वनवास गुरूवारी संपताच वहानगावचे उपसरपंच प्रशांत कोल्हे गावात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अख्खे गाव एकवटले होते.
अवघ्या २६ वर्षाच्या वयात प्रशांत कोल्हे यांनी गावातील समस्या घेऊन प्रशासनाला धारेवर धरत गावात अनेक विकास कामे करीत ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. निवडून येताच गावाच्या पुढारपणाची धुरा मिळाली. उपसरपंचाची धुरा सांभाळत असतानाच दारूविक्रीने विळखा घातला. गावातून दारूविक्री हद्दपार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत आंदोलनाची साखळी सुरू केली. पोलीस दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत नसल्याने ग्रामपंचायत खुले आम दारूविक्री करेल, असा ग्रामसभेने निर्णय घेतला होता.
मात्र दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करताना पोलीस विभाग व तहसीलदार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी २३ आॅक्टोबरला एक आदेश काढून उपसरंपच कोल्हे यांना ५६ दिवसांसाठी जिल्हाबंदी केली. या जिल्हाबंदीचा वनवास बुधवारी सपंला. त्यामुळे त्यांचे गुरुवारी सकाळी वहानगाव येथे आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी अख्खे गाव रस्तावर एकवटले होते.
गावातील अबालवृद्ध महिला, युवक असा संपूर्ण गाव एकत्र येवून स्वागतासाठी फटाक्याची आतिषबाजी करीत होते. ढोल, ताशासह गावातून मिरवणूक काढली. त्यामुळे गावात एक मोठा समारंभ असल्याचे जाणवत होते.
न्यायालयाने फेटाळली होती याचिका
जिल्हाबंदी आदेशाविरूद्ध नागपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र न्यायालयाने कोल्हे यांची याचिका खारीज करून जिल्हाबंदी आदेश कायम ठेवला होता. त्यामुळे प्रशांत कोल्हे यांनी २३ आॅक्टोबर ते २० डिसेंबर असा ५६ दिवसांचा जिल्हाबंदी वनवास भोगला.

Web Title: The village singled out for the signing of the panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.