सेवानिवृत्त होऊन जन्मभूमीत परतलेल्या जवानाचा गावकऱ्यांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:24+5:302021-07-07T04:34:24+5:30
चंद्रपूर : पश्चिम बंगाल येथून बांगलादेश बॉर्डरवर २० वर्षे ६ महिने देशसेवा करत सेवानिवृत्त होऊन भद्रावती तालुक्यातील घोटनिबांळा येथील ...
चंद्रपूर : पश्चिम बंगाल येथून बांगलादेश बॉर्डरवर २० वर्षे ६ महिने देशसेवा करत सेवानिवृत्त होऊन भद्रावती तालुक्यातील घोटनिबांळा येथील वीर जवान अनिल संभाजी जिवतोडे आपल्या जन्मभूमीत परतताच गावकऱ्यांनी त्याचे मोठ्या हर्षोल्हासात स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
अनिल जिवतोडे ३ जानेवारी २००१ ला भारतीय सेनेत सामील झाले होते. यांनी जम्मू काश्मीर, गुजरात, बांगलादेश येथील बॉर्डरवर २० वर्षे सहा महिने देशसेवा केली. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. त्याचे कुटुंब घोटनिबांळा येथे राहत असल्याने ते स्वगृही परतले. आपल्या गावातील जवानाने भारतीय सेनेत २० वर्षे सेवा देऊन देशसेवा केली. स्वत:च्या जीवाची परवा न करता बॉर्डरवर रात्रंदिवस पहारा दिला. या भावनेने घोटनिबांळावासीयांचा ऊर भरून आला. ते स्वगृही येताच गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करून त्याचा सत्कार केला. यावेळी सरपंच देवेेंद्र रामटेके, उपसरपंच प्रवीण नन्नावरे, माजी सरपंच विलास राऊत, गोमाजी राऊत, संदीप नागपुरे, कैलास दुधकोहळे, आकाश ढवस, अनिल ढवस, विजय नेहारे, विशाल कोडापे, दिलीप राऊत, राजू तांदुळकर आदी उपस्थित होते.