कन्हाळगाव अभ्यारण्यास ग्रामस्थाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:35+5:302020-12-25T04:23:35+5:30

तोहोगाव : शासनाने नुकतेच कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले. याचे वन्यजीव प्रेमी संघटनेने स्वागत केले. परंतु या भागातील परंपरागत वनवासी,वनमजुर ...

Villagers oppose Kanhalgaon sanctuary | कन्हाळगाव अभ्यारण्यास ग्रामस्थाचा विरोध

कन्हाळगाव अभ्यारण्यास ग्रामस्थाचा विरोध

Next

तोहोगाव : शासनाने नुकतेच कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले. याचे वन्यजीव प्रेमी संघटनेने स्वागत केले. परंतु या भागातील परंपरागत वनवासी,वनमजुर यांना विश्वासात घेतले नाही. वर्षानुवर्षापासून वन रोजीवर अवलंबून असणाऱ्याच्या उपजीविकेचा गंभीर प्रश निर्माण होणार आहे. ज्या आदिवासीनी जंगल सुरक्षित ठेवले त्याच आदिवासींवर जंगलाबाहेर काढण्याचा कुटील कारस्थान असल्याचा आरोप करीत तीव्र विरोध केला असून अभयारण्य रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणपूर,झरण, चिवनडा, कान्हाळगाव येथील ग्रामस्थानी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जिहाधिकारी,मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहे. कन्हाळगाव अभयारण्य निर्मितीबाबत शासन हालचाली सुरू करीत त्याबाबत प्रभावित होणाऱ्या गावे,त्याचे पुनर्वसन,रोजगार बाबत अभ्यास केला लोकांचा विरोध होऊ नये म्हणून सर्व गावात सभा घेतले केवळ एकच सभा घेऊन अभयारण्य बाबत माहिती दिली त्यानंतर प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थानी ग्रामपंचायत मध्ये विरोधी ठराव करीत अभ्यारण्यास विरोध दर्शविला होता असे असतानाही ग्रामस्थाना विश्वासात न घेता खोट्या अहवालावर ,जनतेची दिशाभूल करीत अभयारण्य घोषित केले ,ज्या ज्या भागातील जंगले आदिवासींनी सुरक्षित ठेवली ती जंगले शासनाने अभयारण्य नाहीतर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून त्या भागातील परंपरागत वनवासी,आदिवासींना जगलाबाहेर आणले परंतु त्या आदिवासींच्या पूर्वसनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले ताडोबा अभयारण्यातील प्रभावित गावाचे पुनर्वसन,आणि रोजगार हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही यामुळे या गावातील जनतेत या निर्णयाचा तीव्र पाने निषेध करीत आहेत शासनाने अगोदर आमचे पुनर्वसन,आणि रोजगाराचा प्रश्न निकाली काढावे नाहीतर अभयारण्य चा निर्णय रद्द करण्यात यावे असे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणपूर,कान्हाळगाव,झरण, चिवनदा,आदी प्रभावित गावातील जनतेनी दिला आहे

Web Title: Villagers oppose Kanhalgaon sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.