गरीब हर्षलच्या उपचारासाठी गावकरी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:03+5:302021-09-05T04:32:03+5:30
रामचंद्र उर्फ भुरू कोडापे हा करंजी गावातील मजूर. हातावर आणून पानावर खाण्याइतपत त्याची परिस्थिती. काम मिळाले की कुटुंब जगणार ...
रामचंद्र उर्फ भुरू कोडापे हा करंजी गावातील मजूर. हातावर आणून पानावर खाण्याइतपत त्याची परिस्थिती. काम मिळाले की कुटुंब जगणार अन्यथा दोन वेळच्या अन्नाची समस्याच. जन्मापासूनच रामचंद्रच्या वाट्याला दारिद्र्य आले. अफाट मेहनत करूनही परिस्थितीत कुठलाच बदलाव नाही. आदिवासी समाजातील हे दुर्लक्षित कुटुंब. त्यांच्या कुटुंबातील हर्षल कोडापे या २३ वर्षाच्या तरुणाचा अपघात झाला आणि आता जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. चंद्रपुरातील कोलसिटी हास्पिटलमध्ये हर्षलला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तिथे विविध ‘टेस्ट’साठीदेखील कुटुंबीयांकडे पैसा नव्हता. हर्षल पैशांअभावी उपचारापासून वंचित होता. ही बाब माहीत होताच गावातील नागरिकांनी सढळ हाताने मदत केली. सर्वांच्या सहकार्यातून हर्षलवर शस्त्रक्रिया झाली. तरीही डॉक्टरने सांगितल्यानुसार पुढील उपचारासाठी अजूनही सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.