ग्रामस्थांनी रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:10 PM2018-08-01T23:10:45+5:302018-08-01T23:11:04+5:30

सनफ्लॅग कंपनीतून डोंगरगाव रेल्वे साईडींगपर्यत ट्रकद्वारे कोळसा वाहतूक केला जाते. कोळशाच्या ट्रकमुळे विद्युत तारा तुटल्या व त्यात एक शेतकरी बचावला. कंपनीने खबरदारी घ्यावी व इतर मागण्या पूर्ण कराव्यात, याकरिता डोंगरगाव वासीयांनी बुधवारी सनफ्लॅग कंपनीची कोळसा वाहतूक रोखून धरली.

Villagers stop blocking coal | ग्रामस्थांनी रोखली कोळसा वाहतूक

ग्रामस्थांनी रोखली कोळसा वाहतूक

Next
ठळक मुद्देसनफ्लॅग कंपनी : उपाययोजना करा- मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सनफ्लॅग कंपनीतून डोंगरगाव रेल्वे साईडींगपर्यत ट्रकद्वारे कोळसा वाहतूक केला जाते. कोळशाच्या ट्रकमुळे विद्युत तारा तुटल्या व त्यात एक शेतकरी बचावला. कंपनीने खबरदारी घ्यावी व इतर मागण्या पूर्ण कराव्यात, याकरिता डोंगरगाव वासीयांनी बुधवारी सनफ्लॅग कंपनीची कोळसा वाहतूक रोखून धरली.
वरोरा तालुक्यातील बेलगाव गावानजीक सनफ्लॅग कंपनी भूमीगत कोळसा खाण आहे. या कोळसा खाणीतून डोंगरगाव रेल्वे गावापर्यंत कोळशाची वाहतूक ट्रकद्वारे केली जाते. ३१ जुलैला रात्री ७ वाजताच्या सुमारास एमएच ३४ एबी ३०८० या क्रमांकाचा ट्रक कोळसा खाली करून जात असताना विद्युत तारा तुटल्या. याचवेळेस बैलगाडी घेवून जाणाऱ्या एका शेतकºयानजीक जीवंत तारा पडल्या. यात शेतकरी सुदैवाने बचावला.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्र्मचाºयांनी घटनास्थळाकडे धाव घेवून विद्युत पुरवठा सुरळीत केला. मात्र असे प्रकार नेहमीच घडत आहेत. कंपनीतून कोळशाची वाहतूक करणारे ट्रक भरधाव वेगाने जात असतात. धुळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारले जात नाही. जड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
धुळीमुळे दरवर्षी पिके करपली जात आहे. त्यांची नुकसान भरपाई दिली जात नाही. अशा अनेक मागण्यांसाठी डोंगरगावचे सरपंच राकेश काळे व ग्रामस्थांनी वाहतूक अडविली. यावेळी बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
आमदारही पोहोचले
आ. बाळू धानोरकर यांनी घनास्थळी भेट देऊन दिली. २ आॅगस्ट रोजी वरोरा तहसील कार्यालयात कंपनी अधिकाºयासोबत बैठक घेण्याचा निर्णय तहसीलदार सचिन गोसावी यांनी घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख प्रमोद मगरे, निलेश भालेराव, मनीष जेठाणी उपस्थित होते.

Web Title: Villagers stop blocking coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.