बल्लारपुरात विमाशि संघाची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:23+5:302021-09-06T04:32:23+5:30
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डब्लू. ए. शेख होत्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून विमाशी संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले होते. जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, ...
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डब्लू. ए. शेख होत्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून विमाशी संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले होते. जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, विजूकटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खाडे, सिनेट सदस्य दीपक धोपटे यांची मंचावर उपस्थिती होती.
सुधाकर अडबाले यांनी शिक्षक संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. शाळांमधली विविध समस्या, एकस्तर पदोन्नती, नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता, आश्रमशाळा, तसेच अतिरिक्त शिक्षक भत्ते व थकीत बिल या सर्व विषयांवर बोलत या समस्या सोडवण्याचा प्रयत्न विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रा. राजेंद्र खाडे, प्राध्यापक दीपक थोपटे, तसेच सुधाकर अडबाले यांचा त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक संघटनेचे तालुका अध्यक्ष आर. आर. निखाडे व संचालन पी. एम. उरकुडे यांनी केले. आभार एम. एन. पानघाटे यांनी मानले.
050921\1320-img-20210905-wa0007.jpg
बल्लारपूरात विमाशिसंघाची सहविचार सभा