बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:43+5:302021-09-06T04:32:43+5:30

युवकांना राजकीय धडे देण्याची गरज चंद्रपूर : सर्वच क्षेत्रांत युवक जात असले तरी राजकारणात युवकांचा शिरकाव कमी दिसून येत ...

Violation of social distance in the bar | बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

Next

युवकांना राजकीय धडे देण्याची गरज

चंद्रपूर : सर्वच क्षेत्रांत युवक जात असले तरी राजकारणात युवकांचा शिरकाव कमी दिसून येत आहे. अनेकांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवकांना राजकीय विश्लेषकांद्वारे मार्गदर्शन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर

चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकीत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते; मात्र काही वर्षांतच या मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. काही मशीन चार्जिंग करण्यासाठी चार्जर नसल्याने मशीन बंद आहेत.

मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज एक तरी मुलगी छेडछाडीची किंवा अत्याचाराची बळी ठरत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या नराधमांना धडा शिकविण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर पातळीवर मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वजन काट्यांची तपासणी करावी

चंद्रपूर : दरवर्षी विक्रेत्यांच्या वजनकाट्याची तपासणी करण्याचे निर्देश आहेत; मात्र अनेक व्यापाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी बाजारामध्ये तर अनेक विक्रेते वजनाऐवजी दगडाचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे

चंद्रपूर : गृहविभागाने पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे, तसेच सैन्यभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक या भरतीत सहभागी व्हावे, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.

मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते; मात्र आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणकचालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यामुळे शासनाने मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी आहे.

महिला शौचालयाची निर्मिती करावी

चंद्रपूर : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र शहरातील एकाही चौकात महिला शौचालय नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते. अनेकदा महिला शौचालयाची मनपाकडे मागणी करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहरात वाहतुकीची खोळंबा

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यावर दुकानदार, हातठेलेवाले व काही नागरिक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मनपाकडून एखाद्या वेळेस कारवाई करण्यात येते. त्यानंतर काही दिवस हे हातठेलेवाले दुकान हटवितात. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटतात.

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

चंद्रपूर : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबटसारख्या हिंस्त्र प्राण्यामुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

Web Title: Violation of social distance in the bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.