विसापूर ग्रा. पं. सरपंचपदी वंचितच्या वर्षा कुळमेथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:48+5:302021-02-06T04:52:48+5:30
नांदगाव पोडे येथे सरपंचपदासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. सरपंचपदासाठी तीन उमेदवारांनी आवेदनपत्र भरले. त्यामध्ये भाजपाचे दोन गट व महाविकास आघाडीच्या ...
नांदगाव पोडे येथे सरपंचपदासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. सरपंचपदासाठी तीन उमेदवारांनी आवेदनपत्र भरले. त्यामध्ये भाजपाचे दोन गट व महाविकास आघाडीच्या एक यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली. पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे यांच्या गटाच्या प्राजक्ता अनिल उरकुडे या सरपंच झाल्या. त्यांना ५ मते मिळाली. त्यांच्याविरोधात उभी असणारी मनोहर देऊळकर गटाच्या त्यांची सून मंजू देऊळकर यांना ४ मते, माजी सरपंच मधुकर पोडे समर्थित महाविकास आघाडी गटाच्या पुष्पलता वाढई यांना २ मते मिळाली. तर याच गटाच्या (महाविकास आघाडी) नीलिमा राहुल दुधे या उपसरपंच झाल्या. त्यांना सात मते मिळाली. एकंदरीत सरपंच उपसरपंच हे पोडे समर्थित गटाचेच झाले.
हडस्ती येथे भाजपाच्या अंजली गुरुदास पारखी सरपंचपदावर विराजमान झाल्या. उपसरपंच नारायण भोयर हे बिनविरोध निवडून आले.