विश्वास नांगरे पाटील बुधवारी साधणार युवकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:47 PM2019-01-14T22:47:36+5:302019-01-14T22:47:50+5:30

महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धार् परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या आयोजनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत सुरू असून या स्पर्धा परीक्षा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.

Vishwas Nangre Patil will interact with youths on Wednesday | विश्वास नांगरे पाटील बुधवारी साधणार युवकांशी संवाद

विश्वास नांगरे पाटील बुधवारी साधणार युवकांशी संवाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धार् परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या आयोजनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत सुरू असून या स्पर्धा परीक्षा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सरकारी नोकरीमधील टक्का वाढावा. यासाठी मिशन सेवा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचे वेगवेगळ्या स्तरावरील प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
दिवसभराच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. दिवसभराच्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत असणारी संधी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची आव्हाने, भारतीय प्रशासकीय सेवेचा प्रवास मिशन सेवा बद्दलची माहिती, तसेच विविध वक्तव्यांकडून प्रेरणादायी मार्गदर्शनाची सत्रे दिवसभर विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. सध्या चांदा क्लबवर ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन सुरू आहे, त्याच ठिकाणी एका भव्य शामियानामध्ये हा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. मिशन सेवा अंतर्गत सध्या जिल्ह्यामध्ये दर रविवारी सराव पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केल्या जाते. हजारो विद्यार्थी आॅनलाईन रजिस्ट्रेशन करतात.
यापूर्वी युथ एम्पावरमेंट समिट घेतले होते. त्यामध्ये ३८ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले. यापैकी पाच हजार विद्यार्थ्यांना ५२ कंपन्यांनी आपापल्या आस्थापनावर नोकरी दिली आहे. आदिवासीबहुल समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या या प्रतिसादाला एक सामूहिक शक्तीचे स्वरूप देण्याचे काम ना. मुनगंटीवार मिशन सेवाच्या माध्यमातून करत आहेत.

Web Title: Vishwas Nangre Patil will interact with youths on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.