सहकार राज्यमंत्री यांची भद्रावती नगर परिषदेला भेट
By admin | Published: July 7, 2016 12:53 AM2016-07-07T00:53:28+5:302016-07-07T00:53:28+5:30
नगर परिषद भद्रावतीच्या कार्यालयाला सहकार राज्यमंत्री दादाजी घुसे यांनी सदिच्छा भेट दिली.
दादाजी घुसे : पालिकेच्या विकासात्मक कामांमुळे भारावलो
भद्रावती : नगर परिषद भद्रावतीच्या कार्यालयाला सहकार राज्यमंत्री दादाजी घुसे यांनी सदिच्छा भेट दिली. भद्रावती पालिकेच्या कार्यप्रणाली व विकासात्मक कामांमुळे आपण भारावून गेलो असून राज्यात जिथे जाईल, तिथे भद्रावती पालिकेचा दर्जा, आदर्श इतरांपुढे ठेवीन, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
याप्रसंगी आ. बाळू धानोरकर यांना शिवसेनेचा ‘धाण्या’ आमदार असे त्यांनी संबोधले. पालिकेला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सदिच्छा भेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाळू धानोरकर होते. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, ठाणेदार निकम, मुख्याधिकारी विनोद जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. न.प. सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पालिका स्थापन झाल्यापासून भद्रावतीकरांनी शिवसेनेकडे एकहाती सत्ता दिली. भद्रावतीकरांचे प्रेम, सहकार्य मी कधीही विसरुन शकणार नाही, असे आमदार बाळू धानोरकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. येथील घनकचरा प्रकल्प, पाणी पुरवठा योजना, हुतात्मा स्मारक सौंदर्यीकरण, भक्त निवास, नस, कार्यालय व सभागृह, स्वच्छता मोहिम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रा. सचिन सरपटवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)