ऐतिहासिक शाळेला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:22+5:302021-01-08T05:33:22+5:30
गोंडपिपरी : ब्रिटिश अधिकारी कर्नल स्मिथ यांनी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे शाळा सुरू केली. चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन झालेली ...
गोंडपिपरी : ब्रिटिश अधिकारी कर्नल स्मिथ यांनी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे शाळा सुरू केली. चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन झालेली ही मुलींची पहिली शाळा ठरली. १०० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या या ऐतिहासिक शाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांनी नुकतीच भेट दिली.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. धाबा येथे राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. उपस्थित नागरिकांनी गावाच्या प्राचीन इतिहासाची माहिती दिली. गावात १०० वर्षे पार केलेल्या ऐतिहासिक शाळेची माहिती होताच त्यांनी शाळेला भेट देऊन देत इतिहास जाणून घेतला. यावेळी बबन पत्तीवार, ठाणेदार सुशील धोकटे, सिध्दार्थ भगत, विठ्ठल चनकापुरे आदी उपस्थित होते.