९२ दिवसांसाठी माया होणार पर्यटकांच्या नजरेआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:46 PM2019-06-22T23:46:21+5:302019-06-22T23:47:37+5:30

वाघाच्या हमखास दर्शनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही महिन्यांपासून माया व तिच्या दोन बछडयांनी आपल्या विविध प्रकारच्या कृतीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

Visitors will be at the forefront of the night for 92 days | ९२ दिवसांसाठी माया होणार पर्यटकांच्या नजरेआड

९२ दिवसांसाठी माया होणार पर्यटकांच्या नजरेआड

googlenewsNext
ठळक मुद्देबफरक्षेत्र राहणार सुरू । १ जुलैपासून ताडोबा कोअर पर्यटकांसाठी बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाघाच्या हमखास दर्शनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही महिन्यांपासून माया व तिच्या दोन बछडयांनी आपल्या विविध प्रकारच्या कृतीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. वन विभाग व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नियमामुळे येत्या १ जुलैपासून (पावसाळ्यात) ताडोबातील कोअर झोनमधील पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत. त्यामुळे ताडोबातील माया तब्बल ९२ दिवस पर्यटकांच्या नजरेआड जाणार आहे
चंद्रपूर जिल्यातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ६२५ चौ किमीमध्ये विस्तारलेले असून या प्रकल्पात आजघडीला ८६ वाघ आणि जंगली डुक्कर, २५ बिबट, चितळ, हरीण, अस्वल, रानगवे, मोर, मगर, असे अनेक प्राण्यांचे वास्तव आहे. त्यामुळेच या प्रकल्पाची प्रसिध्दी सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे ताडोबात दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे.
सर्व पर्यटकांना वाघाचे दर्शन व्हावे म्हणून ताडोबात कोअर झोन व बफ्फर झोन असे दोन विभाग करण्यात आले आहे.
ताडोबातील शंभर टक्क्यांपैकी फक्त २० टक्के क्षेत्रच पर्यटकांसाठी खुले ठेवले आहे. त्यामध्ये जंगलातील अनेक भागांत पर्यटकांचे वाहन जाण्यासाठी अडचण आहे. तर वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये व पर्यटकांना आनंद घेता यावा म्हणून काही क्षेत्र पर्यटनासाठी सुरू आहे. मात्र पावसाच्या दिवसात पर्यटकांचे वाहन जंगलात जाण्यास अडचण असते. त्यामुळे वाहन रोडमध्ये अडकून राहून दुर्घटना घडू नये. याशिवाय पावसाळ्यचा काळ हा वन्यप्राण्यांसाठी प्रजननासाठी योग्य असतो. म्हणून या दिवसात ताडोबातील पर्यटन बंद करण्यात येणार आहे.
मागील अनेक महिन्यापासून ताडोबातील सिलेब्रिटी ठरलेली माया वाघिणीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे तिची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक आतूर असतात. यासाठी ते कितीही किंमत मोजण्यासाठी तयार असतात. मात्र पावसाळ्यात ताडोबा पर्यटनासाठी बंद राहत असल्याने माया व पर्यटकांना तब्बल ९२ दिवस दूर राहावे लागणार आहे

वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी बंद
व्याघ्र प्रकल्पाच्या नियमावलीनुसार वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी १ जुलै ते ३० सप्टेबर या पावसाच्या कालावधीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात पर्यटन बंद राहणार आहे. मात्र या कालावधीत बफरझोन क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
-एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.

ताडोबातील बफर झोन क्षेत्र राहणार सुरू
हौशी पर्यटकांचा हिरमोड होऊ नये व त्यांना बाराही महिने पर्यटनाचा आनंद घेता यावा म्हणून वन विभागाने बफर झोन क्षेत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अंतर्गत रामदेगी, अलिझंजा -पळसगाव बफर वनपरिक्षेत्रांतर्गत कोलारा, मदनापूर, मोहर्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत आगरझरी, देवाडा व चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत मामला झोन या गेटमधून पर्यटकांना आॅनलाईन व स्पॉट बुकिंग करून प्रवेश देण्यात येणार आहे.

हे क्षेत्र राहणार बंद
मागील काही वर्षांपासून ताडोबातील कोअर झोन क्षेत्र १ जुलैपासून बंद करण्यात येत आहे. त्यामध्ये मोहर्ली गेट, खुतवंडा गेट, नवेगाव गेट, कोलारा गेट या गेटमधील कोअर क्षेत्र ३१ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: Visitors will be at the forefront of the night for 92 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.