ग्रामपंचायतींसाठी शातंतेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:31 PM2018-02-27T23:31:06+5:302018-02-27T23:31:06+5:30
जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. सर्व उमेदवारांचे भाग्य मशिन बंद झाले असून बुधवारी निकाल घोषित होणार आहे.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, लावारी व मानोरा येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले. लावारी येथे ८१.९७, नांदगाव पोडे येथे ७२.१० तर मानोरा येथे ७८.४३ टक्के मतदान झाले. वरोरा तालुक्यातील सोईट, भटाळा, वनोजा येथे पोटनिवडणूक तर येन्सा व अर्जुनी येथे सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील वॉर्ड नं. २ साठी पोटनिवडणूक झाली. येथे ८७.७७ टक्के मतदान झाले तर सास्ती येथील ११ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. येथे ३८ उमेदवार सदस्यपदासाठी तर सात उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात होते. रात्री उशीरापर्यंत मतदान चालले. त्यामुळे येथील मतदानाची टक्केवारी मिळू शकली नाही. तर चुनाळा येथील पोटनिवडणुकीसाठी ८५.८६ टक्के, पाचगाव येथे ८० टक्के तर डोंगरगाव येथे ७८ टक्के मतदान झाले.
चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड नं. २ मधील एका जागेसाठी ७२.३३ टक्के तर कोरपना तालुक्यातील नारंडा येथील पोटनिवडणुकीसाठी ७९.७२ व शेरज (बु) येथे ६७.९८ टक्के मतदान झाले. जिवती तालुक्यातील शेडवाही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८४.८० टक्के मतदान झाले. मूल तालुक्यातील चिरोलीच्या वॉर्ड नं. २ च्या पोटनिवडणुकीत ७२.३३ टक्के मतदान झाले. निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बुधवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची धडधड वाढली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात एकही नामांकन नाही
ब्रह्मपुरी : तालुक्यातील मरारमेंढा, किटाळी, बरडकिन्ही व चौगान या चार ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र चारही ग्रामपंचायतीमधून एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने येथे मतदान घेण्यात आले नाही.