आज मतदान; प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 12:33 AM2017-02-16T00:33:38+5:302017-02-16T00:33:38+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून गुरूवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Voting today; Admin ready | आज मतदान; प्रशासन सज्ज

आज मतदान; प्रशासन सज्ज

Next

चोख पोलीस बंदोबस्त : मतदार, उमेदवार व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर
चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून गुरूवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी पोलीस विभागाने जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त लावला असून उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात आहेत. गुरूवारला पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात १ हजार ४५० मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहेत. यात नक्षलग्रस्त संवेदनशिल म्हणून ६३ मतदान केंद्र तर १७८ मतदान केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांवर १३० क्षेत्रीय अधिकारी, १५९६ मतदान केंद्राध्यक्ष व ६ हजार ३७५ मतदान अधिकारी कार्यरत राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात ११ लाख ५७ हजार ७५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यात ६ लाख १ हजार ८६६ पुरूष मतदार तर ५ लाख ५५ हजार ८८७ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविणे व कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी ३५८ वाहने आरक्षित करण्यात आली होती. मतदानाचे सर्व साहित्य केंद्रावर पोहोचले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

दारू तस्करांवर लक्ष
निवडणूक शांततेत पार पडुन कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी नियोजन पूर्ण केले असून दारूबंदी जिल्हा असल्या कारणाने दारूच्या बाबतीत पोलीस प्रशासन विविध मोहीमेद्वारे कठोर पाऊले उचलली आहेत. निवडणुकीपुर्वीच १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात दारूच्या ३७९ गुन्हे नोंद करून ४४० आरोपीसह ६९ वाहने जप्त केली. यात एकुण २ कोटी ४१ लाख १२ हजार ७७३ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२ हजार ११५ जवानांचा अतिरिक्त ताफा
निवडणूक बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलाचे ३ हजार २७१ पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून विविध ठिकाणी एसएसटी पॉईन्ट स्ट्रायकिंग फोर्स आणि पेट्रोलिंग पार्टी तयार करण्यात आल्या आहे. तसेच बंदोबस्तासाठी बाहेरून मागविण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये १५ अधिकारी, एसआरपीएफचे ३ प्लाटुन (९० कर्मचारी व १० अधिकारी), पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला व नागपूर येथून ५५० कर्मचारी, तसेच अकोला व नागपूर मुख्यालय येथून २०० पुरुष कर्मचारी, होमगार्ड ९०० व वायरलेस विभागाचे ८० कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त वनविभागाचे २० कर्मचारी व सिक्युरीटी विभागाचे २५० कर्मचारी असा २ हजार ११५ कर्मचाऱ्यांचा ताफा सुरक्षेसाठी बंदोबस्तात आहे.

पोलीस मित्रांचीही मदत
पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक व १४५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक हे बंदोबस्त अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच बंदोबस्तामध्ये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दोन हजार पोलीस मित्रांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. विविध पेट्रोलिंग पथकाद्वारे सर्व जिल्हाभर पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे. याकरीता १६५ सरकारी व खाजगी वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३७ (१) व (३) कलम लागू
चंद्रपूर : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याचे दृष्टीने चंद्रपूरचे जिल्हादंडाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व तालुक्यामध्ये कलम ३७ (१) व (३) जारी केले आहे. हे आदेश १४ फेबुवारीच्या मध्यरात्री पासून लागू झाली असून २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत अमलांत राहील. या अवधीमध्ये पाच किंवा अधिक व्यक्ति एकत्र येण्यावर तसेच जीवितास इजा होईल, अशी वस्तू स्वत: जवळ बाळगण्यावर कलमान्वये बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Voting today; Admin ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.