५१५९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:27+5:302020-12-24T04:26:27+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. ५ हजार १५९ ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यावर्षी १५ हजारावर नवमतदार तरुण आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाज बजावणार आहे.जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील ८५, वरोरा ७७, ब्रह्मपुरीतील ७० ग्रामपंचायतीसह अन्य तालुक्यातही निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, जिवती तालुक्यात केवळ एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात विसापूर, माजरी, घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचीही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे गावागावात सध्या राजकीय वातावरण तापायला लागले असून अनेकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली आहे. तर काही इच्छुकांनी शहरातील नेत्यांसोबतच गाठीभेटी वाढविल्या आहे. ग्रामपंचायत निवडणून पॅनलद्वारे लढविली जात असली तरी अधिकाधिक उमेदवार आपल्याच पक्षाचे निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून कर्मचाऱ्यांचे विविध प्रशिक्षणही पार पडले आहे.
ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान -६२९
एकूण सदस्य -५१५९
एकूण प्रभाग -१९८१
मतदान केंद्र- २१४५
---
१५ जानेवारी रोजी २ हजार १४५ मतदान केंद्रावरून निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनानेही तयारी केली आहे. अनुचित प्रकार घडू नयम्म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी हे करा
उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी ग्रामपंचातीचा कर भरणे गरजेचे आहे. शौचालय असल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे, दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता प्रमआमपत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्ज भरताना असणे बंधनकारक आहे.
२)उमेदवारी अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी तो ऑनलाईन पद्धतीने भरून त्याचे प्रिंट घेऊन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. सोबतच प्रतिज्ञापत्र ऑनलाईन भरून त्याची प्रिंट आवश्यक कार्यवाही करून अधिकाऱ्यांना सादर करावा लागेल. जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावती असली तरीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार येणार. वयाचा पुरावाही अर्जासोबत जोडावा लागणार आहे.