टाकाऊ मांसामुळेच वाघाचे बस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:43 PM2018-09-10T22:43:36+5:302018-09-10T22:44:07+5:30
गेल्या चार दिवसांपासून पट्टेदार वाघाने या भागात जे बस्तान मांडले आहे, त्याचे कारण आयुध निर्माणीच्या हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गालगतचे मटण व चिकन मार्केट असल्याची बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : गेल्या चार दिवसांपासून पट्टेदार वाघाने या भागात जे बस्तान मांडले आहे, त्याचे कारण आयुध निर्माणीच्या हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गालगतचे मटण व चिकन मार्केट असल्याची बाब समोर आली आहे.
बकऱ्याचे टाकाऊ भाग हे मटण व्यवसायिक त्याच भागातील जुन्या केंद्रीय विद्यालय परिसरात टाकत असतात. पट्टेदार वाघाला कोणतीही शिकार न करता दररोज हे मांस सहज मिळत असल्याने तो या भागातून जाणार नसल्याचे मत वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी तहसीलदार महेश शितोळे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या समक्ष सांगितले.
बुधवारी या पट्टेदार वाघाचे दर्शन काही पायदळ फिरणाºया नागरिकांना झाले. तेव्हापासून त्याला हुसकावून लावण्यासाठी वनविभाग काही संस्थाना हाताशी घेवून प्रयत्नरत आहे. परंतु हा वाघ त्या परिसरातून जाण्याचे नावच घेत नाही. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वरील बाब समोर आली आहे. सुरूवातीला मटण व चिकन व्यवसायिक महामार्गाच्या कडेला बसत होते. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने आयूध निर्माणी प्रशासनाने त्यांना लगतच्यास आपल्या जागेत चिकन, मटण विक्रीचे दुकाने लावण्याची परवानगी दिली. या मटन मार्केटमध्ये कोणत्याही सोई-सुविधा दिल्या नाही. आजही हे मटण व्यवसायिक उघड्यावरच आपला व्यवसाय करीत आहे. या मार्केटच्या मागील भागील भागत विस्तीर्ण असे झुडपी जंगल आहे. त्या ठिकाणी हे व्यवसायिक बकºयाचे टाकाऊ भाग टाकतात. हे टाकाऊ भाग पट्टेदार वाघाचे पसंतीचे खाद्य आहे. ते सहज मिळत असल्याने वाघ हे क्षेत्र सोडत नसल्याने मत वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी भद्रावती तहसीलदार महेश शिमोळे, नगराध्यक्ष धानोरकर व न. प.च्या आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिले. त्या व्यवसायिकांना एकत्र बोलावून टाकाऊ भाग हा नगरपालिकेच्या कचरा गाडीतच टाका, जर यापूढेही हा प्रकार थांबला नाही तर दंडात्मक कारवाई करून येथील मटण विक्रीचे मार्केट हलविण्यात येईल, असा ईशारा दिला. तसेच डूक्कर मालकांनी या भागातील डूकरे पकडून इतरत्र हलवावे, अशीही तंबी देण्यात आली आहे.