सामाजिक वनिकरण विभागाकडे सात महिन्यांपासून मजुरी थकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:14+5:302021-09-16T04:34:14+5:30
सामाजिक वनीकरणांतर्गत येणाऱ्या बिजोनी नर्सरी आहे. या नर्सरीमध्ये सात मजुरांना १३ फेब्रुवारी २०१९ पासून ते १० मार्च २१पर्यंत कामावर ...
सामाजिक वनीकरणांतर्गत येणाऱ्या बिजोनी नर्सरी आहे. या नर्सरीमध्ये सात मजुरांना १३ फेब्रुवारी २०१९ पासून ते १० मार्च २१पर्यंत कामावर ठेवले. प्रत्येक मजुराची मजुरी ३७७ रुपये प्रतिदिन ठरविण्यात आली. प्रत्येक मजुराला दहा हजार १७९ रुपये याप्रमाणे ७१ हजार २५३ रुपये घेणे आहे. आज सात महिन्यांचा कालावधी झाला. अद्यापही मजुरांना मजुरी मिळाली नाही. याबाबत विचारणा केली असता अनुदान यायचे आहे, एवढेच सांगितले जाते. त्यामुळे मजूर काम करून आपली रक्कम आपल्याला मिळेल का नाही, याबाबत संभ्रमात आहे. त्यामुळे त्यांनी आमची मजुरी आम्हास तातडीने देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन डीएफओ यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनाही देण्यात आल्या.