हरवलेल्या बछड्यांच्या शोधात वाघिणीची गावाभोवती भ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:58 AM2021-06-29T07:58:35+5:302021-06-29T07:59:10+5:30

गावात दहशत; जागोजागी पायाचे ठसे

Waghini wanders around the village in search of lost calves | हरवलेल्या बछड्यांच्या शोधात वाघिणीची गावाभोवती भ्रमंती

हरवलेल्या बछड्यांच्या शोधात वाघिणीची गावाभोवती भ्रमंती

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी गोंडमोहळी वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुडपामध्ये  भरदिवसा वाघिणीने ठाण मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव (पिपर्डा) (चंद्रपूर) : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या पळसगाव व परिसरात  सहा दिवसांपूर्वी एक वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी धुमाकूळ घातला. गावातील गोऱ्हा ठार करून दोघांना जखमी केले आहे. त्यानंतर  वाघीण व बछड्याला पिटाळून लावण्याच्या प्रयत्नात वाघीण व तिच्या दोन बछड्यांची ताटातूट झाली. वाघिणीचे बछडे तिच्यापासून दूर झाल्यामुळे वाघिणीने हा परिसर अद्याप सोडलेला नाही. सोमवारी सकाळी पळसगावाच्या दिशेने वाघिणीचे पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांत दहशत पसरली आहे. 

रविवारी गोंडमोहळी वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुडपामध्ये  भरदिवसा वाघिणीने ठाण मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.  दरम्यान, काही शेतकरी रविवारी आपली शेतीचे कामे करण्याकरिता गेले असता वाघिणीच्या बछड्याचे दर्शन झाले. सोमवारी पुन्हा पळसगावाच्या दिशेने वाघिणीचे ठसे आढळून आले.  अधूनमधून तिच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकून गावात प्रचंड दहशत आहे. 

वाघिणीपासून धोका
ही वाघीण आपल्या बछड्यांपासून दुरावली आहे. सैरभैर झाली आहे. अशा वेळी तिच्याकडून गावकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. सहा दिवस लोटून गेल्यानंतरही वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी या वाघिणीला या परिसरातून हुसकावू शकले नाही, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Waghini wanders around the village in search of lost calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.