विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर वाघोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:12 PM2018-12-07T23:12:34+5:302018-12-07T23:13:04+5:30

सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला.

Waghoba on the students' street | विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर वाघोबा

विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर वाघोबा

Next
ठळक मुद्देरस्त्यावरच ठाण : नागरिकांनी पिटाळून लावल्यानंतर रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा : सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला. यामुळे विद्यार्थ्यांची पाचावर धारणच बसली. मात्र काही वेळानंतर तिथे काही नागरिक जमा झाले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. त्यानंतर विद्यार्थी व नागरिक त्या रस्त्याने पुढे जाऊ शकले.
सावली वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबटासह हिंस्र पशुंचा वावर आहे. आता हे प्राणी मानवीे वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. गेवरा- मेहा बिटातील बारसागड, निफंद्रा, डोंगरगाव, गेवरा बुज, करोटी, आकापूर, खानाबाद या गावातील शेतकरी, नागरिकांना सध्या गाव शिवारातून पट्टेदार वाघीण फिरताना दिसून येत आहे. कराली जंगलात गेवरा येथील एका शेतकऱ्यांच्या बैलबंडीवर वाघाने हल्ला चढविला.
मात्र अन्य शेतकºयांच्या प्रसंगवधनाने बैलासह शेतकरी बचावला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावरुन वाघ ठाण मांडून बसला होता. त्यामुळे विद्यार्थी तिथेच थांबले. त्यानंतर ते घाबरुन माघारी वळले. काही वेळाने नागरिकही तिथे आले. सर्वांनी मिळून वाघाला रस्त्यावरून पिटाळून लावले.
मागील आठवड्यापासून बारसागड, गेवरा बुज, निफंद्रा परिसरात पट्टेदार वाघ व दुसरीकडे दोन पिलांसह वाघीण गावशिवारातून फिरत असल्याने शेतकºयात दहशत आहे. शेतीची कामे सायंकाळच्या आत आटोपून घरी परतत आहेत. रस्त्यावर वाघ दिसल्याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचारी परिसरात लक्ष ठेवून आहे.
दोन बछड्यासह फिरत आहे वाघीण
बारसागड परिसरात दोन बछड्यासह वाघीण फिरत आहे. वाघीण सध्या बछड्यांना सोडण्याच्या परिस्थितीत असल्याने तिचा वावर झुडपी जंगल परिसरात वाढला आहे. वाघांच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. अनुचित प्रकार घडू नये, याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांनी लोकमतशी बोलताना केले.
वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
चिंधिचक (बुज.): नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे गावात वाघाची दहशत सुरु असून गुरुवार सकाळी वाघाने श्यामराव कोरेवार यांच्या मालकीच्या दोन शेळ्या ठार केल्या. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुन्हा वाघाने शेळ्यावर हल्ला केला. परंतु दिवसाची वेळ असल्यामुळे नागरिक धावले व वाघ झुडपी जंगलात पसार झाला.

Web Title: Waghoba on the students' street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.