कृषी वीजपंपची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:28 AM2021-01-20T04:28:55+5:302021-01-20T04:28:55+5:30
वीज खांबावर वेल वाढली चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील वीज खांबावर तसेच पथदिव्यांवरही वेली वाढल्या आहे. त्यामुळे ...
वीज खांबावर वेल वाढली
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील वीज खांबावर तसेच पथदिव्यांवरही वेली वाढल्या आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. स्वच्छतेकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. या वेली तसेच झुडपे कापून स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
स्वच्छता अभियान नावापुरतेच
चंद्रपूर : राज्य शासनाने नगर परिषदेला माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावात स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते. काही नगर परिषदेने सदर अभियान योग्य पद्धतीने राबविले मात्र काही नगर परिषदेने या अभियानाकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जप्त केलेली रेती घरकुलांना द्यावी
चंद्रपूर: जिल्ह्यात रेती घाटांचे अद्यापही लिलाव झाले नाही. त्यामुळे काही रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करीत आहे. दरम्यान, प्रशासनाने यातील काही वाहनांनातील रेती साठा जप्त केली आहे. हा साठा घरकुलांना देवून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुकुटबन बस नियमित सोडण्याची मागणी
घुग्घुस: चंद्रपूर येथील आगारातून चंद्रपूर ते मुकुटबन बस सोडण्यात येते. मात्र ही बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन ही बस वेळेत सोडावी तसेच बसफेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
महापालिकेते पथक कुचकामी
चंद्रपूर : शहरात नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात मांजा विकल्या जात आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या व्यावसायिकांवर कारवाईसाठी मनपाने पथकांचे गठण केले आहे. मात्र अद्यापही एकही कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
---