काकळघाट मार्गाला डांबरीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:53+5:302021-06-25T04:20:53+5:30
देवाडा :राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय सोंडो अंतर्गत देवापूर ते काकळघाट गावाकडे जाणारा ...
देवाडा :राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय सोंडो अंतर्गत देवापूर ते काकळघाट गावाकडे जाणारा रस्ता पूर्णत उखडला आहे? या मार्गावर नेहमीच किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे मार्गाचे डांबरीकरण केव्हा होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जिवती, गडचांदूर व देवाडा, राजुरा, तेलंगणाला जोडणाऱ्या मार्गे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, काकळघाट, भुरकुंडा, भेदोडा, रानवेली, मंगी, अंबुजा सिमेंट कंपनी, सुकडपल्ली, देवापूर येथील नागरिक नेहमी देवाडाकडे ये-जा करीत असतात. कधी दैनंदिन खरेदीसाठी कधी बँकेच्या कामासाठी तर कधी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे येत असतात. मात्र तीन किमी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे.