पणन महासंघाच्या कापूस खरेदीची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:33+5:30
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : पणन महासंघाने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. परिणामी, खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापसाची लूट करत आहे. त्यामुळे शासनाने सरकारी कापूस केंद्र्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ नाही. शासनाने अद्याप सरकारी कापूस संकलन केंद्र्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांना अल्प भावात विकावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राजुरा, कोरपना, वरोरा, माढेळी येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केली जायची. परंतु पणनने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
धान उत्पादकांची चिंता वाढली
सिंदेवाही : धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता दिसत असल्याने धान उत्पादकांची चिंता वाढली तर दुसरीकडे रब्बी हंगामाकरिता शेतात काय पेरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाच्या वतीने हरभरा व गहू अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जात आहे. अत्यल्प पाण्यात पिकणारे वाण हरभºयाला चांगली मागणी आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे गतवर्षी हरभरा व गव्हाला अल्प भाव जाहीर मिळाला. नफातोट्याचा विचार करता शेतकºयांची गुजरान होईल, एवढे उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी रब्बी हंगामात कोणती पिके घ्यावी, याविषयी चिंताग्रस्त झाले आहेत. भाजीपाल्यातही फुलकोबी व पानकोबीला पाहिजे तेवढा भाव नसल्याने शेतकरी हे पीक घेवू शकत नाही. टमाटरला वर्षभर भाव मिळाला नाही. वांग्याला व मिरचीला बºयांपैकी भाव मिळाला. नवे तंत्र शेतकºयाच्या शेतात पोहचल्यास निश्चितच शेतकरी रब्बी पिके घेऊ शकतात. मात्र, अवकाळी पावसाने यंदा शेतकºयांचे नियोजन कोलमडल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.