शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:20 AM2019-02-22T00:20:12+5:302019-02-22T00:25:07+5:30

प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या ...

Waiting for farmers to hike cotton | शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षाच

शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षाच

Next




प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. कापूस पिकविण्यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत कापसाला बाजारपेठेत मिळणारा दर तोकडा आहे. फेब्रुवारी महिना संपायला आला तरी कापसाचे दर अजूनही वाढले नसल्याने शेतकºयांनी कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत घरीच ठेवला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.
विदर्भ प्रांत कापूस पिकासाठी अग्रेसर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते, दरवर्षी शेतकरी कापसावर खूप मोठा खर्च करतात. त्या तुलनेत उत्पादन होणे आवश्यक आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढल्याने कोरडवाहू शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून शेती केली. मात्र यावर्षी शेतकºयांच्या उत्पादनाचा टक्का घसरला आहे. यंदा उत्पादन घटल्याने शेतकºयांना शेती करणे न परवडणारे झाले आहे. शेती नेहमीच संकटात सापडत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. शेती पिकत नसल्याने शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.
अनेक शेतकºयांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. खरे तर कमी दरात शेतमाल विकणे परवडत नाही. परंतु शेतकºयांचा नाईलाज असतो. सुरुवातीला कापसाचे दर चांगले होते. पाच हजार ८०० रुपयापर्यंत कापूस विकला जायचा. मात्र अचानक कापसाचे दर तब्बल ५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाच हजार ३०० रुपयापासून उत्पादनावर झालेला खर्च बघता हा दर शेतकºयांना परवडणारा नाही. कापसाचे भाव वाढेल, या आशेवर कापूस घरीच आहे.

कापूस विकल्यानंतर वाढतात दर
मार्च महिन्यात शेतकºयांना बँकांकडून घेतलेले कर्ज भरायचे असते. त्यामुळे मार्च एंडींगपर्यंत शेतकºयांना शेतमाल विकणे गरजेचे असते. दरवर्षी शेतमाल विकल्यानंतरच दर वाढविले जातात. हा अनुभव शेतकºयांच्या पाठिशी आहे.

कापूस पिकवायला मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्या तुलनेत कापसाला शासनाने दर देणे अपेक्षित आहे. तोकडा कापूस दर शेतकºयांना अजिबात परवडणारा नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी कापूस अजूनही घरीच ठेवला आहे.
- चेतन बोभाटे, युवा शेतकरी, गोवरी

Web Title: Waiting for farmers to hike cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस