नाफेडच्या चुकाऱ्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:14 PM2018-05-16T23:14:37+5:302018-05-16T23:14:37+5:30

मागीलवर्षी वेळी अवेळी पाऊस पडला. त्यानंतर रोगाच्या प्रादुर्भावाचा तुरीलाही फटका बसला. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने शेतकऱ्यांना तूर वाचविण्यात यश आले. बऱ्यापैकी तूर निघाली.

Waiting for the farmers of Nafed pigs | नाफेडच्या चुकाऱ्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

नाफेडच्या चुकाऱ्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देतूर उत्पादकांची बोळवण : जिल्ह्यात ३१ क्विंटलची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागीलवर्षी वेळी अवेळी पाऊस पडला. त्यानंतर रोगाच्या प्रादुर्भावाचा तुरीलाही फटका बसला. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने शेतकऱ्यांना तूर वाचविण्यात यश आले. बऱ्यापैकी तूर निघाली. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना नकार देत नाफेडला पसंती दिली. त्यामुळे मागील चार महिन्यांत जवळपास ३१ हजार ६१७ क्विंटल तुरीची खरेदी नाफेडने केली. मात्र, त्यातील काही मोजक्यात तूर उत्पादकांना चुकारे देण्यात आले. तर शेकडो उत्पादकांना अजूनही तूर खरेदीच्या चुकाºयाची प्रतीक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
धान, सोयाबीन, कापसापाठोपाठ जिल्ह्यात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खासकरुन कोरपना, राजुरा, वरोरा आणि चंद्रपूरच्या काही भागांत तुरीचे पीक घेतल्या जाते. यंदा तुरीचे उत्पादनबºयापैकी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचवल्या होत्या. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांपासून जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीची प्रक्रिया सुरु केली. यासाठी जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा आणि चंद्रपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीची व्यवस्था करण्यात आली होती. पूर्वी बाजार समितीत तूर आणल्यानंतर त्याची खरेदी व्हायची. मात्र, खरेदीला वेळ लागायचा. त्यामुळे त्यात नाफेडने बदल केला.
यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आॅनलाईन नोंदणी करण्याचे तूर उत्पादकांना सांगण्यात आले. त्यामुळे पीकपेराचा सातबारा, बँक पासबुक आणि आधार कॉर्ड घेऊन शेतकºयांनी नोंदणी केली. त्यानंतर बाजार समितीतून संदेश आल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर नाफेडच्या स्वाधीन केली. एप्रिल महिन्यात पाच हजार ९१७.४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यांचे पैसेही टप्प्याटप्प्याने देण्यात आले होते.
१५ मे रोजी तूर खरेदीची शेवटची तारीख होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अनेक शेतकºयांनी तूर नाफेडला विकली. त्यात चंद्रपुरात चार हजार ६९६ क्विंटल, वरोरा येथे १५ हजार ६५७ क्विंटल, कोरपना आठ हजार ५९२ क्विंटल आणि राजुरा येथे दोन हजार ६१६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एप्रिल महिन्यात ज्यांनी तूर विकली. त्यांना पैसे देण्यात आले. मात्र, शेवटच्या टप्प्यात तूर विकणाऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही.
निधीच नसल्याने पैसे तूर उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. त्यामुळे त्यांच्या नाफेडच्या कार्यालयात चकरा सुरु झाल्या असून त्वरीत चुकारा देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Waiting for the farmers of Nafed pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.