पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:41 AM2021-02-26T04:41:13+5:302021-02-26T04:41:13+5:30

मामा तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात ...

Waiting for police patrol honorarium | पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा

पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा

Next

मामा तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नवीन वस्त्यांत रानडुकरांचा शिरकाव

चंद्रपूर : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाहेर अंगणात छोटी बालके खेळत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

पांदण रस्त्यांची समस्या सोडवा

घोडपेठ : परिसरातील पांदण रस्त्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो. घोडपेठ गावाच्या नकाशावर शेत, रस्ते, पांदण रस्त्यांची नोंद आहे. परंतु, काहींनी या रस्त्यांवर अतिक्रमण केले. शेतीची मशागत व बांधबंदिस्ती करताना झाडे-झुडपे वाढली. अतिक्रमण केल्याने पांदण रस्ते गायब झाले. आपापसात वाद वाढले. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पांदण रस्ते तयार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

चंद्रपूर : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना मागील काही वर्षांपासून सुरु करण्यात आली होती. जिल्ह्यातील सावली, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा आदी तालुक्यातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्तादेखील नाही. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

रेडियमअभावी अपघाताची शक्यता

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सहयोगी संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पडोली चौकातील अतिक्रमण हटवा

पडोली : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवण्याची मागणी

सिंदेवाही : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बँकांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व बँक कर्मचारी मास्क, सॅनिटायझर व हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करीत आहेत. बँक शाखेत एकावेळी कमीत कमी ग्राहकांना आत सोडले जात आहे. बँकेच्या आत व बाहेरही अंतर पाळले जात आहे. मात्र, बँक व कंत्राटदाराने एटीएमचे संपूर्ण सॅनिटायझेशन करण्याचे निर्देश असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. लॉकडाऊन असल्याने ग्राहकांचा एटीएमद्वारे रक्कम काढण्याकडे कल आहे. एटीएमसमोरही ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवण्याची मागणी ग्राहकांनी बँकांकडे केली आहे.

पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी

मूल : राजोली परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. त्यावर अंकुश लावण्यासाठी राजोली येथे पोलीस चौकी स्थापन करावी, अशी मागणी होत आहे. राजोली परिसरात कोंबड बाजार, जुगार, अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येथे पोलीस चौकी नसल्याने गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारचा वचक नाही.

विटा व सिमेंटवर प्रशिक्षणाचे आयोजन

चंद्रपुर : सॅम्युअल स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राद्वारे विनायक अपार्टमेंट दोन शुभम ट्रेडर्सच्या बाजूला, मेजर गेट दुर्गापूर, येथे सुशिक्षित बेरोजगारांकरिता विटा, सिमेंटद्वारे विविध प्रकारच्या केले जाणाऱ्या साहित्यावर आधारित १५ दिवसीय प्रशिक्षण २६ फेब्रुवारी रोजी देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये विटा, सिमेंट उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण प्रात्यक्षिकद्वारे दिल्या जाईल. तसेच या सर्व उद्योगासाठी मार्केटिंग कशाप्रकारे केले जातात हेही शिकविल्या जाणार आहे. एकदिवसीय इंडस्ट्रियल दौरा ही करण्यात येणार आहे. यामध्ये शॉप ॲक्ट लायसन्सबद्दल मार्गदर्शन, कर्जासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यात येईल. स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: Waiting for police patrol honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.