१७ वर्षापासून कुनाड्यातील प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:04+5:302021-04-07T04:29:04+5:30

भद्रावती : प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरणाने वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता एरणीवर आला आहे. भद्रावती तालुक्यातील कुनाडा येथील ४१० ...

Waiting for project-affected justice in Kunada for 17 years | १७ वर्षापासून कुनाड्यातील प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत

१७ वर्षापासून कुनाड्यातील प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत

Next

भद्रावती : प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरणाने वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता एरणीवर आला आहे. भद्रावती तालुक्यातील कुनाडा येथील ४१० एकर जमीन वेकोलि खुल्या कोळसा खाणीकरिता संपादित केली. मात्र यातील आठ शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी नोकरी, नंतरच जमीन असा पवित्रा घेतल्याने तब्बल १७ वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. घाटे आत्महत्या प्रकरणानंतर वेकोलि प्रशासन आता तरी प्रकल्पग्रस्तांचा विचार करतील अशी आशा या शेतकऱ्यांना पडली आहे.

वेकोलिने कुनाडा येथील शेतजमीन संपादित करुन सातबाऱ्यावर वेकोलिने आपले नाव चढवले. वेकोलि समोर हताश झालेल्या आठ शेतकऱ्यांपैकी सात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र यातील पांडुरंग पुरुषोत्‍तम महाजन यांची कोर्टकचेरीसाठी पैसे नसल्याने ते १७ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

मौजा कुनाडा येथील ४१० एकर शेतजमीन खुल्या कोळसा खाणीकरिता वेकोलीने माजरी क्षेत्राकरिता २००४ साली संपादित करण्यात आली. सी.बी.ए ॲन्ड डी ॲक्ट १९५७ च्या कलमांतर्गत संपादित केलेल्या शेतजमिनीवर शेतजमीन धारकांना किंवा त्याच्या आश्रितांना नोकरी मिळणार नाही, याबाबत लेखी व तोंडी प्रकल्पग्रस्तांना कळविले. मात्र हा नियम प्रकल्पग्रस्तांना मान्य नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी पहिले नोकरी नंतर जमीन असा पवित्रा घेऊन २००४ साली आंदोलन उभारले होते. त्यात वेकोलिने तात्पुरता तोडगा काढण्यासाठी येथील काही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले. आता संपूर्ण प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणार असे वाटले. परंतु, यातील आठ प्रकल्पग्रस्तांना नोकरी व मोबदलापासून वंचित ठेवले. परंतु, त्यांच्या जमिनीच्या सातबारावर वेकोलिने आपले नाव चढवले या न्यायिक मागण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त सतरा वर्षापासून वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे पायपीट करीत आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने हे शेतकरी भूमिहीन झाले असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.

Web Title: Waiting for project-affected justice in Kunada for 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.