वेकोलि प्रकल्पग्रस्तांना एकरी ८ ते १० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:02 AM2017-11-17T01:02:51+5:302017-11-17T01:03:20+5:30
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या चालू प्रकल्प व विशेषत: पोवनी-३ या प्रकल्पाच्या बाबतीत जमिनीचा दर व नोकरी यासबंधी महत्त्वपूर्ण बैठक ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या चालू प्रकल्प व विशेषत: पोवनी-३ या प्रकल्पाच्या बाबतीत जमिनीचा दर व नोकरी यासबंधी महत्त्वपूर्ण बैठक वेकोलिचे सीएमडी आर. आर. मिश्र, डायरेक्टर डॉ. संजय कुमार यांच्यासोबत सोमवारी नागपूर येथे घेतली. या बैठकीत वेकोलिमधील चालू प्रकल्पामध्ये व पोवनी-३ या प्रकल्पामध्ये सी.बी. अॅक्ट १९५७ मधील कलम १४(१) चा वापर करून शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रूपये मोबदला व सीआयएल आर अॅन्ड आर पॉलिसी २०१२ प्रमाणे नोकºया द्यावे, असे निर्देश दिले.
दर वाढीमुळे वेकोलिमधील चालू सात प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे. यात बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी-३, धोपटाळा एक्सटेन्शन, चिंचोली रिकास्ट तसेच वणी क्षेत्रातील बेलोरा नायगांव डिप, निलजई डिप, मुंगोली एक्सटेन्शन व वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी प्रकल्प यांना फायदा होणार आहे.
या बैठकीत वेकोलिचे सीएमडी आर. आर. मिश्र यांनी पवनी-३ प्रकल्पाच्या जमिनीच्या दराच्या बाबतीत वेकोलिच्या अधिकाºयांची विषय समजण्यात चूक झाली. नागपूर मुख्यालयातच पवनी-३ प्रकल्पाचे बिल असून हा प्रकल्प पहिला असेल की ज्याचे कॅम्पेनशेन बिल हे नागपूर मुख्यालयातूनच पारीत होईल, असे सांगितले.
४ नोव्हेंबर रोजी ना. अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक आयोजित केली होती. त्यादृष्टीने १३ नोव्हेंबरला वेकोलि सीएमडी सोबत बैठक आयोजित करून या बैठकीत वेकोलि अधिकाºयांना ना. अहीर यांनी कोळसा मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे पोवनी-३ व इतर प्रकल्पात काम करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे विकेंद्रीकरण होवून शेतकºयांच्या प्रकल्पाचे कॉम्पेन्सेशन बिल आता दिल्लीऐवजी नागपूर येथूनच मान्यता मिळणार असून वेकोलिचे सीएमडी यांनी पोवनी-३ प्रकल्पाचे बिल येत्या दोन महिन्यात नागपूर येथेच निकाली काढावे, असे निर्देश दिले आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे आपण काम करणार असून पोवनी-३ या प्रकल्पाचे बिल जलदरित्या पूर्ण करून हा प्रकल्प लवकरच सुरू करण्याची ग्वाही वेकोलिचे सीएमडी यांनी दिले. या निर्णयामुळे वेकोलि पोवनी-३ च्या प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच चांगला दर तसेच नोकºया मिळणार आहेत.