वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:26 PM2017-10-29T23:26:21+5:302017-10-29T23:26:42+5:30

दिल्ली येथे ना. हंसराज अहीर यांनी वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र व कोळसा मंत्रालयातील सचिव सुशीलकुमार यांच्यासोबत वेकोलिमधील चालू प्रकल्पांचा प्रश्न सोडविण्याकरिता शुक्रवारी बैठक बोलाविली होती.

WakeLine should pay compensation to project affected people | वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा

वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जमिनीचा दर कमी न होता नोकºया मिळणारच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिल्ली येथे ना. हंसराज अहीर यांनी वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र व कोळसा मंत्रालयातील सचिव सुशीलकुमार यांच्यासोबत वेकोलिमधील चालू प्रकल्पांचा प्रश्न सोडविण्याकरिता शुक्रवारी बैठक बोलाविली होती. बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी-३, धोपटाळा एक्सटेशन, चिंचोली रिकास्ट तसेच वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी ओपनकास्ट प्रकल्प, वणी क्षेत्रातील निलजई डीप एक्सटेशन, बेलोरा नायगाव डीप, मुंगोली डीप एक्सटेशन या सर्व प्रकल्पावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोळसा मंत्रालयातील सचिव व इतर सर्व अधिकारी यांनी सर्व पुरावे तपासले असता वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र यांना निर्देश देत, सर्व चालू प्रकल्पात जमिनीच्या दरात कुठेही कपात होणार नाही व सीआयएल आर अँड आर पॉलिसी २०१२ नुसार नोकºयासुद्धा देण्यात यावेत, असे बजावले. या निर्देशानंतरही वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र यांनी कुठलीही कार्यवाही केली नसून व वेकोलिच्या क्षेत्रीय कार्यालयाला कळविले सुद्धा नाही. यात वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र यांची चूक असून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन हे त्यांच्या चुकीचा परिणाम आहे व कोळसा उत्पन्नाचे नुकसान व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान याला सर्वस्वी जबाबदार वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र हेच आहेत.
पोवनी-३ प्रकल्पातील आंदोलन हे केवळ अधिकाºयांच्या चुकीमुळे सुरू असून केंद्र सरकारच्या धोरणांचा चुकीचा अर्थ काढून या अधिकाºयांनी राष्ट्रीय नुकसान केले असून याला केवळ वेकोलिचे सीएमडी जबाबदार आहेत, असे सांगितले.
ना. अहीर यांनी वेकोलि सीएमडीच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करीत मागील २० दिवसात ४० हजार टनाचे उत्पन्न ठप्प झाले आहे. तर वेकोलि मुख्यालयामार्फत कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानंतर कारवाई न केल्यामुळे आजही आंदोलन सुरू आहे. वेकोलि अधिकाºयांची भूमिका ही सरकार विरोधात व राष्ट्राचे नुकसान करणारी दिसून येते. बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी-३ या प्रकल्पात ७१० प्रकल्पग्रस्तापैकी ६६० प्रकल्पग्रस्तांनी जमिनीचा करारनामा केलेला असून वेकोलिद्वारे या क्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंच साखरी, सुब्बई, चिंचोली, वरोडा, सास्ती, धोपटाळा, यांना २०१३ सालीच जमिनीच्या दराचे मोबदला द्यावा, असे निर्देश वेकोलि अधिकाºयांना दिले आहेत.

Web Title: WakeLine should pay compensation to project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.