शक्तीशाली ब्लॉस्टींगने घराची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:54 PM2017-09-02T23:54:35+5:302017-09-02T23:55:00+5:30
वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लॉस्टींगने गोवरी येथील शंकर काळे (४५) यांच्या घराची भिंत सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोसळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लॉस्टींगने गोवरी येथील शंकर काळे (४५) यांच्या घराची भिंत सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोसळली. यात सुदैवाने अख्खे कुटुंबच बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लॉस्टींगमुळे गावकºयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या गोवरी, पोवनी, सास्ती, साखरी परिसरात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. वेकोलिची गोवरी व पोवनी कोळसा खाण गावाला अगदी लागून आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली स्फोट घडविले जातात. भूकंप झाल्यागत जमिनीला धक्के बसतात. त्यामुळे बहुतांश घरांना अल्पावधीतच तडे गेले आहे. गोवरी येथील शंकर काळे यांच्या घराची भिंत कोसळली.मात्र सुदैवाने भिंत मागील बाजुस पडली. त्यावेळी शंकर काळे यांचा मुलगा, मुलगी, पत्नी घरीच होते. मात्र नशिब बलवत्तर म्हणून ते या दुर्घटनेतून बचावले.
त्यामुळे वेकोलित कोळसा उत्खननासाठी घडवून आणत असलेले शक्तीशाली ब्लॉस्टींग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. वेकोलित नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली स्फोट घडवून आणले जातात. नियमांची एैशीतैशी करणाºयांवर कडक कारवाई का केली जात नाही, हा चिंतनाचा विषय आहे. वेकोलिचे जबाबदारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ब्लॉस्टींगने अशा दुर्घटना घडतात.
अनेक घरांना भेगा
ब्लॉस्टींगने गोवरी येथील अनेक घरांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. अल्पावधीतच घरांना तडे जात असल्याने ब्लॉस्टींगने घरे कमकुवत होत चालली आहे. वेकोलित ब्लॉस्टींग करताना काही नियम आखून दिले आहेत. परंतु या नियमांची वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांकडूनच पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे दिवसागणिक दुर्घटनेत मोठी वाढ झाली आहे. ब्लॉस्टींगने शंकर काळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.
मोठा अनर्थ टळला
गोवरी येथील शंकर काळे यांच्या घराची भिंत कोसळली, तेव्हा घराशेजारील चिमुकली मुलेही तिथे खेळत होती. मात्र घटनेच्या पाच मिनिटापूर्वीच खेळणारी चिमुकली मुले तिथून निघून गेली आणि काही वेळातच काही न कळायच्या आत घराची संपूर्ण भिंतच कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.