राजुरा तालुका क्रीडा संकुलाची भिंत कोसळली राजुरा तालुका क्रीडा संकुलातील लांब उडीचे मैदान गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:18+5:302021-05-12T04:29:18+5:30
सास्ती : राजुरा तालुका क्रीडा संकुल मैदानात लांब उडीसाठीच्या धावपट्टी व मैदानाचे बांधकाम सुरू आहे. यात लांब उडीसाठी धावपट्टी ...
सास्ती : राजुरा तालुका क्रीडा संकुल मैदानात लांब उडीसाठीच्या धावपट्टी व मैदानाचे बांधकाम सुरू आहे. यात लांब उडीसाठी धावपट्टी व रेती असणारे मैदान तयार करण्यात येत आहे. रेती असणारे मैदान तयार करण्यासाठी चार बाजूने भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र सोमवारी झालेल्या वादळी पावसात एका बाजूची भिंत कोसळून लांब उडीचे मैदान गेले वाहून गेले. यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत २ लाख ७९ हजार रुपये किमतीचे लांब उडीचे मैदान चंद्रपूर येथील कंत्राटदाराकडून तयार करण्यात येत आहे. या मैदानाचे काम करताना अंदाजे १० मीटर लांब, ३ मीटर रुंद व १ मीटर उंच असे रेती भरण्यासाठी टाकीसारखे भिंतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु भिंतीच्या मजबूतीसाठी कुठेच सिमेंट काँक्रीटचे पिल्लर किंवा कॉलम घेण्यात आले नसल्याने भिंतींना पायाभुत आधार नाही. यामुळे काहीच दिवसात एका पावसामध्ये ही भिंत कोसळून पडली. यामुळे क्रीडा विभागाकडून होत असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर शंका निर्माण होत आहे.