बंदीवानांच्या भक्तिनादाने तुरुंगाच्या भिंती गहिवरल्या
By admin | Published: January 17, 2015 10:55 PM2015-01-17T22:55:10+5:302015-01-17T22:55:10+5:30
आयुष्याच्या वळणावर हातून एखादा गुन्हा घडतो. त्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावे लागते. पण त्यांच्यातले माणूसपण वा भक्तीभाव संपत नाही. याची अनुभूती शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात आली.
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
आयुष्याच्या वळणावर हातून एखादा गुन्हा घडतो. त्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावे लागते. पण त्यांच्यातले माणूसपण वा भक्तीभाव संपत नाही. याची अनुभूती शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात आली. निमित्त होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जंयती आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे.
श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांसाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, कारागृह अधिक्षक जाधव, निरीक्षक अशोक महल्ले, श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, विद्याताई देवाळकर, गिता रंगारी, डांगे, उत्तमराव देवाळकर, साळवे गुरुजी, नगरसेविका वर्षा सुंचूवार, विकास राजूरकर, कारागृह शिक्षक ललित मुंडे आदी उपस्थित होते. येथील कारागृहामध्ये ५५० कैदी आहे. यातील बहुतांश न्यायबंदीतील आहे. चांगला माणूस घडवून काढण्याची जबाबदारी कारागृहासह सामाजिक संघटनांनी स्विकारली आहे. प्रथम कैद्यांनी तुकडोजी महाराजांचे भजन गायीले. या भजनामध्ये कैद्यांतील भजनाच्या माध्यमातून आपल्यातील कला सादर केली. दरम्यान कैद्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.