वृद्ध शेतकऱ्याची न्यायासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:41 PM2019-02-19T22:41:45+5:302019-02-19T22:42:04+5:30
तालुक्यातील पुयारदंड येथील सदाशिव गवळी यांच्या एका मुलाची जागा मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालव्याकरिता विक्री करून अधिग्रहित करण्यात आली. मात्र दुसऱ्या मुलाच्या वाटणीला आलेल्या जागेवर कोणत्याही पूर्व संमतीशिवाय खोदकाम करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील पुयारदंड येथील सदाशिव गवळी यांच्या एका मुलाची जागा मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालव्याकरिता विक्री करून अधिग्रहित करण्यात आली. मात्र दुसऱ्या मुलाच्या वाटणीला आलेल्या जागेवर कोणत्याही पूर्व संमतीशिवाय खोदकाम करण्यात आले. ज्या जागेवर काम केले त्या भावाच्या जागेची विक्री केली नाही. या विरोधात न्यायासाठी शेतकऱ्याची दहा वर्षांपासून कार्यालयात पायपीट करीत आहे. मात्र न्याय मिळाला नाही. तर बावणथळी उपसा कालवा सिंचन प्रकल्प कार्यालय व कंत्राटदार दहा वर्षांपासून शेतकऱ्याला उडवाउडावीची उत्तरे देत आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालवाच्या माती खोदकाम व बांधकामाकरिता सदाशिव गवळी यांनी आपसी वाटपाद्वारे भु.क्र. ८९/१ आराजी १.४६ हेक्टर शेतजमीन आपला मुलगा प्रकाश गवळी तर भु.क्र.८९/२ आराजी १.२० हेक्टर जमीन दुसरा मुलगा विकास गवळीला दिली. त्याची सातबाºयावर नोंद घेऊन दोघांचेही वेगळे-वेगळे सातबारे बनविले. विकास हा उदरनिवार्हाकरिता बाहेरगावी राहत असल्याने त्याच्या शेतीची देखभाल सदाशिव गवळीच करतात. कालव्याचे खोदकाम करताना प्रकाशकडून अधिग्रहित केलेल्या जागेव्यतिरिक्त विकासच्या मालकीच्या भु. क्र .८९ /२ मध्येही खोदकाम करण्यात आले. या विरोधात सदाशिव गवळी यांनी प्रकल्प अधिकारी व कंत्राटदारास जाब विचारला मात्र त्यांच्याकडून टोलवाटोलवी सुरु आहे.
मागील दहा वर्षांपासून सिंमाकन करून ज्यादाच्या जागेत खोदकाम केले. त्यांच्या मोबदल्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनीधीकडे अनेकदा न्याम मागीतला. मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय आपल्याजवळ शिल्लक नाही.
- सदाशिव डोमा गवळी
अन्यायग्रस्त शेतकरी, पुयारदंड