पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:11+5:302020-12-30T04:38:11+5:30
सीटीबस सुरु नसल्याने त्रास चंद्रपूर : चंद्रपूर शहराअंतर्गत महामंडळाच्या वतीने सीटी बस आहे. मात्र लाॅकडाऊनंतर ती बंद करण्यात आली. ...
सीटीबस सुरु नसल्याने त्रास
चंद्रपूर : चंद्रपूर शहराअंतर्गत महामंडळाच्या वतीने सीटी बस आहे. मात्र लाॅकडाऊनंतर ती बंद करण्यात आली. तेव्हापासून अद्यापही बस सुरु करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून सीटीबस सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
----
सिग्नलची उंची वाढवावी
चंद्रपूर : दिवेसेदिवस चंद्रपूर शहरातील लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, महत्वाच्या चौकांमध्ये सिग्नल आहे. मात्र या सिग्नलची उंची कमी असल्यामुळे एखाद्या चौकात मोठे वाहन उभे राहिल्यास मागील वाहनधारकांना सिग्नल सुरु झाले की बंद दिसत नाही. त्यामुळे सिग्नलची उंची वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
----
शाळा सुरु करण्याची मागणी
चंद्रपूर : लाॅकडाऊनपासून अद्यापही शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट आता काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शाळा नियमित सुरु करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी केली जात आहे.