सावधान : जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:20+5:302021-09-18T04:30:20+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह चंद्रपूर शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये २४६ रुग्ण आढळले होते. दरम्यान, ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह चंद्रपूर शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये २४६ रुग्ण आढळले होते. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यात तब्बल ४५४ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहे.
मागील काही दिवसांपासून व्हायरल तापाचे थैमान आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये डेंग्यू, मलेरियाचे लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळेच वेळीच काळजी घेऊन डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
काय आहे लक्षणे ?
डेंग्यू - तीव्र ताप येणे व डोके दुखणे, सांधे व अंगदुखी, अंगावर लालसर व्रण वा पुरळ येणे. डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे.
चिकुनगुनिया - या आजारातील तापाचे लक्षणे सामान्य तापाच्या तुलनेत भिन्न असतात. तीव्र सांध्याच्या वेदना असतात. या व्यतिरिक्त, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा देखील येतो.
काविळ : त्वचा, डोळे पिवळे होणे, मूत्राचा रंग अधिक पिवळा होतो. पोटदुखी, अतिथकवा, उलटी, खास येणे, झोपमोड होणे आदी.
बाॅख्स
दररोज वाढत आहे रुग्ण
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी अशा लक्षणांच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. दररोज शंभर ते सव्वाशे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
बाॅक्स
अशी आहे वर्षभरातील आकडेवारी
डेंग्यू-४५४
कोट
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्णसंख्या वाढली होती. मागील वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी सावध राहावे. ताप तसेच अन्य आजार वाटल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डाॅ. प्रतीक बोरकर
हिवताप अधिकारी.