वरोरा पालिकेच्या कचरा डेपोला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:34 PM2018-04-27T23:34:54+5:302018-04-27T23:35:07+5:30
वणी मार्गावरील कचरा डेपोला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्याकरीता वरोरा न.प., जीएमआर कंपनी, वणी व भद्रावती येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. कचरा डेपोला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वणी मार्गावरील कचरा डेपोला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्याकरीता वरोरा न.प., जीएमआर कंपनी, वणी व भद्रावती येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. कचरा डेपोला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.
वरोरा शहरात न.प. च्या वतीने घंटागाडीने प्रत्येक वॉर्डातील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येते. या कचरा डेपोमध्ये प्लॅस्टिकपासून सिमेंटच्या वस्तु तसेच गांढुळ खत तयार करण्याचे प्रकल्प सुरू आहेत. तेथेच कचºयाची योग्य विल्हेवाट लावली जाते. याकरिता यंत्र सामग्रीचा वापरही केला जातो. यातून महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, कचरा डेपोला आज दुपारी आग लागली. वाºयामुळे आग पसरत जावून कचरा डेपोला विळखा घातला. गोदामात आग लागल्याने प्लॉस्टिक, अन्य साहित्य जळाले तसेच यंत्रसामुग्रीही जळाल्याचे समजते. या घटनेने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.