वरोरा तहसील कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:39+5:302021-04-09T04:30:39+5:30
फोटो वरोरा : वरोरा तालुक्यात * * * * *कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून तालुका हॉटस्पॉट होण्याची ...
फोटो
वरोरा : वरोरा तालुक्यात * * * * *कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून तालुका हॉटस्पॉट होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुरुवारी 9 जण एकाच वेळी * * * *कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तहसील कार्यालय सील करण्यात आले.
वरोरा तालुक्यात बुधवारला सर्वाधिक १०३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली . शहरात लॉकडाऊनसदृश परिस्थिती असली तरी तुरळक प्रमाणात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रस्त्यांवरील गर्दी ही कायम असून * * * * * * * *कोरोना नियमावलीकडे लोक दुर्लक्ष करीत असल्याचे आढळले. गुरुवारला एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांसह नायब तहसीलदार आणि इतर सात महसूल कर्मचाऱ्यांचे * * * * * * *कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने तहसील कार्यालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यासंदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी बाजारपेठेत नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत २५ हजार रुपयांचा दंड ठोकल्याचे सांगितले. यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यामुळे पुढील काही दिवसांकरता बाहेरील अभ्यागतांना तहसील कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे.