वासेरा बनले समस्यांचे माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:22+5:302021-08-12T04:32:22+5:30
गावातील मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग साचले असून कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तर गावातून शेतीकरिता तलावाचे पाणी जाण्यासाठी मायनर ...
गावातील मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग साचले असून कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तर गावातून शेतीकरिता तलावाचे पाणी जाण्यासाठी मायनर असून त्या मायनरमध्येही कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच गावातील गुजरी चौक व वाॅर्ड नंबर एक व चार येथील काही नळधारकांना नळयोजनेचे पाणी पाईपलाईन बरोबर नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. तसेच गावात काही लोक पिल्लूपंप लावून नळाचे पाणी भरत असतात. त्यामुळे गावात काही भागात पाणीपुरवठा अनियमित होत आहे. या समस्यांनी वासेरावासीय त्रस्त आहेत.
गावात गुजरी चौक परिसरात दोन वर्षांपूर्वी नवीन पाईपलाईनचे काम केले. पाईपलाईन लेव्हलमध्ये नसल्यामुळे पावसाळ्यातही काही लोकांना पाणी मिळत नाही. या संबंधात ग्रामपंचायतीला वेळोवेळी माहिती देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. ग्रामपंचायतीने गावातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
100821\img_20210725_100336.jpg
वासेरा येथील मुख्य रस्त्यावर कचऱ्याच्या ढीग