मान्सूनपूर्व नालीसफाई कामात कुचराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:32+5:302021-06-05T04:21:32+5:30
सर्वत्र डासांचा हौदोस - नाल्या तुडुंब, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर गोंडपिपरी : दरवर्षी मान्सूनपूर्व शहरातील संपूर्ण नाल्यांची साफसफाली ...
सर्वत्र डासांचा हौदोस - नाल्या तुडुंब, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गोंडपिपरी : दरवर्षी मान्सूनपूर्व शहरातील संपूर्ण नाल्यांची साफसफाली जात होती. यामुळे पावसाळ्यात सांडपाणी साचून दुर्गंधी व नागरिकांच्या आरोग्यास धोका अशा विविध रोगांपासून बचावात्मक पवित्रा नगर पंचायतकडून घेण्यात येत होता. मात्र, यंदा स्वच्छता कंत्राटदाराच्या कुचराईमुळे शहरातील नाल्या तुडुंब भरल्या असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याचा काळ हा महामारीचा काळ ठरला असून, आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वत्र स्वच्छतेचे संदेश देण्यात येत आहेत, असे असतानाही मान्सूनपूर्व शहरातील प्रत्येक प्रभागाच्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर प्रशासनाकडून नाल्यांची सफाई दरवर्षी केली जाते. मात्र, यंदा या कामात कुचराई करण्यात येत आहे. शहरात एकूण १७ प्रभाग असून, बहुतांश प्रभागातील सांडपाण्याने नाल्या तुडुंब भरून असल्याचे चित्र आहे. आगामी आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळ्याला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारी म्हणून स्वच्छता कंत्राट मिळविणाऱ्या संस्थेकडून अगोदरच स्वच्छतेस सुरुवात व्हायला हवी होती. मात्र, स्वच्छता कंत्राटदार यांनी सदर गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून शहरातील नालीसफाईकडे कानाडोळा केला आहे. सदर स्वच्छता कंत्राटदाराने स्थानिक हनुमान मंदिर ते जनता शाळा या मार्गावरील दोन्ही बाजूने नवीन नालीचे बांधकाम केले. तेही निकृष्ट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
===Photopath===
040621\img_20210531_163135.jpg
===Caption===
गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील घाण साठलेली नाली