रामाळा तलाव रक्षणासाठी पाणी उपसा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:17+5:302021-02-24T04:30:17+5:30

चंद्रपूर : रामाळा तलावातील प्रदूषित पाणी उपसा करून तलावातील प्रदूषण दूर करण्याचा पाणी उपसा आंदोलन इको-प्रो तर्फे ...

Water abstraction movement for protection of Ramala Lake | रामाळा तलाव रक्षणासाठी पाणी उपसा आंदोलन

रामाळा तलाव रक्षणासाठी पाणी उपसा आंदोलन

Next

चंद्रपूर : रामाळा तलावातील प्रदूषित पाणी उपसा करून तलावातील प्रदूषण दूर करण्याचा पाणी उपसा आंदोलन इको-प्रो तर्फे करण्यात आले. इको-प्रो सदस्यांसह स्थानिक युवकांनी सहभागी होत बकेटने तलावातील पाणी काढून दूरवर नालीत फेकत प्रतीकात्मक आंदोलन केले.

रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. यामध्ये फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय मोगरे, दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष ॲड. वर्षा जामदार, श्री वर्धमान सोशल ॲड एज्युकेशन अकॅडमीचे अध्यक्ष महेंद्र मंडलेचा आणि सचिव अमर गांधी, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूरचे सुनील कुलकर्णी, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, उपप्राचार्य डॉक्टर एस. पी. माधमशेट्टीवार, चेतना संघर्ष मंचचे राजेश विजरकर, मनोहरभाई टहलियानी, राजकुमार पाठक, गजानन गावंडे गुरुजी, हनुमान मंदिर समिती चंद्रपूर, डॉ. संजय घाटे, पंकज चिमरालवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. दरम्यान, उद्यापासून इको-प्रो सदस्य-नागरिकांचे साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Water abstraction movement for protection of Ramala Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.