जल व प्राणवायूसाठी वृक्षलागवड करणे गरजेचे

By admin | Published: June 26, 2017 12:42 AM2017-06-26T00:42:08+5:302017-06-26T00:42:08+5:30

जंगलातील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असून दिवसेंदिवस जंगल कमी होत आहे.

For water and oxygen, trees need to be grown | जल व प्राणवायूसाठी वृक्षलागवड करणे गरजेचे

जल व प्राणवायूसाठी वृक्षलागवड करणे गरजेचे

Next

अनिल सोले यांचे प्रतिपादन : वृक्षदिंडीचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : जंगलातील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असून दिवसेंदिवस जंगल कमी होत आहे. त्यामुळे जंगलातील वृक्षांपासून मिळणारा प्राणवायू आणि पडणारा पाऊस कमी होऊन जलसाठा कमी होईल. त्यामुळे प्राणवायू व पाणी खरेदी करावे लागेल. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता समजातील प्रत्येक घटकाने १ ते ७ जुलै या आठवड्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणेला बळकटी देण्यासाठी वृक्षलागवड करण्याचे आवाहन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले
विदर्भामध्ये ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने आयोजित वृक्षदिडीचे चिमूर तालुक्यात आगमन झाल्यावर भाजप पदाधिकारी आणि आमदार कीर्तीकुमार भांगहिया यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीहरी बालाजी देवस्थान येथे आयोजित कार्यक्रमात आ. प्रा. सोले बोलत होते. यावेळी आमदार भांगडिया, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ,.श्यामजी हटवादे, वसंत वारजूकर, श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नीलम राचलवर, ट्रस्टी डॉ. दीपक यावले आदी उपस्थित होते
दरम्यान, आ. प्रा. सोले व आ. भांगडिया यांच्या समवेत वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार पं. स. सदस्य अजहर शेख यांनी केले. या कार्यक्रमाला न.प. चे उपाध्यक्ष तुषार शिंदे, पं. स. सदस्य पुंडलिक मते, स्थायी समिती सभापती छाया कंचलवार, नगरसेविका उषा हिवरकर, हेमलता ननावरे, नगरसेवक सतीश जाधव, माजी जि. प. सद्सया शालुबाई येळणे, सुनील किटे, विकी कोरेकर, समीर राचलवार, एकनाथ थुटे ,शरद गिरडे ,भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुगले, बंडू नाकाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी १४ कलमी वृक्षलागवडी सबंधी शपथ घेण्यात आली.

Web Title: For water and oxygen, trees need to be grown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.