रत्नापूर येथील वाॅटर एटीएम २५ दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:57+5:302021-01-21T04:25:57+5:30
नवरगाव : येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र गावाच्या चौकात बसविलेे; परंतु मागील २५ दिवसांपासून ...
नवरगाव : येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र गावाच्या चौकात बसविलेे; परंतु मागील २५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे बंद झाले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर हे गाव आठ हजार लोकसंख्येचे आहे. शिवणी मार्गावरील उमा नदीपात्रातून नळयोजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावातील सर्व नागरिकांना सुरळीत पाण्याचा पुरवठा होण्यासाठी चार जलकुंभ उभारले आहेत. नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना पाण्यासोबत गाळही येतो. गढूळ पाणी साठविण्याच्या जलकुंभात जमा होते. जलकुंभाची नियमित स्वच्छता होत नाही. यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. नेहमीची समस्या लक्षात घेऊन नळयोजनेलाच जलशुद्धीकरण योजना द्यावी, अशी मागणी गावकरी आणि ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला करण्यात आली आहे. अजूनही ती मान्य झाली नाही.
गावाची गरज लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने जलशुद्धीकरण संयंत्र (वाॅटर एटीएम ) सुरू करण्यात आले. त्याचा लाभ बरेच नागरिक घेतात. मागील २५ दिवसांपासून सदर वाॅटर एटीएमही बंद पडले आहे.