वॉटर एटीएम व पाणी फिल्टर मशीनच तहानलेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:09+5:302021-03-01T04:32:09+5:30
जिवती : आधीच जिवती तालुक्यात नेहमी पाणीटंचाई असते. तालुका हा अतिउंच डोंगरावर वसला असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी इथे टिकून ...
जिवती : आधीच जिवती तालुक्यात नेहमी पाणीटंचाई असते. तालुका हा अतिउंच डोंगरावर वसला असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी इथे टिकून राहत नाही. त्यामुळे या तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईसारख्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत असतो. जिवती शहरात नगरपंचायतीमार्फत वॉटर एटीएम व तीन वाॅटर फिल्टर मशीन दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आल्या. मात्र, या मशीन वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत.
यामुळे सरकारच्या तिजोरीला लाखो रुपयांचा चुना लागल्याचे बोलले जात आहे. स्वच्छ पाण्यापासून शहरातील सर्वसामान्य जनतेला वंचित रहावे लागत आहे. वाटसरुंना बॉटलचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. जिवती नगरपंचायतअंतर्गत लाखो रुपये खर्चून येथील जनतेसाठी वॉटर एटीएम व वाॅटर फिल्टरच्या वास्तू चौकाचौकांत उभ्या केल्या आहे. काही दिवसांतच त्या बंद पडल्या. या वॉटर एटीएमची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ही नगरपंचयातीची आहे. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.