भंगाराम तळोधीत युवकांनी पक्ष्यांसाठी बांधले पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:19+5:302021-04-30T04:36:19+5:30

वढोली :उन्हाळा लागल्याने उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्वत्र लाही-लाही होत आहे. वाढत्या उष्णतेने मनुष्यामात्रासह पक्ष्यांचीही चांगलीच भंबेरी उडाली ...

The water bodies built for the birds by the youth at the bottom of Bhangaram | भंगाराम तळोधीत युवकांनी पक्ष्यांसाठी बांधले पाणवठे

भंगाराम तळोधीत युवकांनी पक्ष्यांसाठी बांधले पाणवठे

Next

वढोली :उन्हाळा लागल्याने उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्वत्र लाही-लाही होत आहे. वाढत्या उष्णतेने मनुष्यामात्रासह पक्ष्यांचीही चांगलीच भंबेरी उडाली आहे. पाण्यासाठी पक्षी सर्वदूर भटकताना दिसून पडत आहेत. त्यांची पाण्यासाठीची भटकंती रोखण्यासाठी युवकांनी एकत्र येत गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे टाकाऊ वस्तूंपासून पक्षी पाणवठे तयार केले आहेत.

दिवसेंदिवस जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे आणि चोहीकडे काँक्रिटचे जंगल वाढत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. यामुळेच की काय पहाटेपासूनच चिमण्यांच्या चिवचिवाटासह किलबिल करणारे विविध प्रजातीचे पक्षीदेखील झपाट्याने कमी होत आहे. अशातच या तप्त उन्हाळ्यात तापणाऱ्या उन्हामुळे दरवर्षी पक्ष्यांवर संक्रांत येत आहे. यामुळे पक्ष्यांचा पाण्याविना जीव जात आहे. याकरिता अनिकेत दुर्गे यांच्या पुढाकारातून गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे पक्ष्यांसाठी टाकावू वस्तूंपासून पाणवठे तयार करण्यात आले. त्यात नियमित पाणी टाकण्याची व्यवस्थादेखील या ठिकाणी केलेली आहे. यावेळी अंकुश भारशंकर, आदित्य उराडे, आकाश भारशंकर, विपुल डोंगरे, अशोक भारशंकर, शुभम बारसागडे, आनंद उराडे, मनिरत्न उराडे, समीर बारसागडे, अंकिता देशट्टीवार यांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: The water bodies built for the birds by the youth at the bottom of Bhangaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.