वनतलावाच्या निर्मितीमुळे जलसंवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:33 AM2019-07-29T00:33:18+5:302019-07-29T00:34:15+5:30
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे.
नारंडा या गावाचा २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेत समावेश करण्यात आला. गावात दोन तलाव असून त्यापैकी एका तलावाचे खोलीकरण करण्यात आले. येथे वनविभागाची जवळपास २५० हेक्टर जागा असून त्यापैकी काही जागेवर वनतलावाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. नारंडा येथे बहुतांश भाग हा पठारी असून पावसाळ्यात सदर पाणी हे पिपरी रस्त्याने शेतकºयांच्या शेतशिवारात जात होते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. या भागात वनतलाव निर्माण झाल्यामुळे पावसाळ्याचे पाणी वनतलावात जमा होत आहे. त्यामुळे तलावाचा लाभ परिसरातील शेतकºयांना होणार आहे.
या तलावासाठी भारतीय जनता युवा मोचार्चे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अॅड. संजय धोटे यांच्या माध्यमातून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर यांच्याकडे पाठपुरवठा केला. त्यानंतर तलावाला मंजुरी मिळाली.
यावर्षी उशिराने पाऊस आला. त्यामुळे प्रथम या तलावात पाणी कमी होते. मात्र मागील दोन दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे तलावातील पाण्याची पातळीत मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.