जल परिषद कृषी विकासाला चालना देणारी

By Admin | Published: January 31, 2016 12:52 AM2016-01-31T00:52:04+5:302016-01-31T00:52:04+5:30

जलपरिषद व कृषी प्रदर्शन ३१ जानेवारीपासून दोन दिवस चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले आहे.

The Water Council encourages agricultural development | जल परिषद कृषी विकासाला चालना देणारी

जल परिषद कृषी विकासाला चालना देणारी

googlenewsNext

आजपासून प्रारंभ : कृषिपुरक व्यवसायासाठी मार्गदर्शन
चंद्रपूर : जलपरिषद व कृषी प्रदर्शन ३१ जानेवारीपासून दोन दिवस चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले आहे. ही जल परिषद कृषी, सिंचन, दुग्ध व्यवसाय, रेशीम व्यवसाय, मत्सव्यवसाय यासह कृषी पुरक व्यवसायाला चालना देणारी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेचे उदघाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर असतील. प्रसिध्द जलपुरुष राजेंद्रसिंह राणा व पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शेडनेट, मुलस्थानी जलसंधारण, शेततळे व विहीर पुर्नभरण प्रात्यक्षिक, ट्रॅक्टर व विविध यंत्र, फळ प्रक्रिया पदार्थ, फळ व भाजीपाला प्रक्रियेचे यंत्र, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती (डिसप्ले बोर्ड, फ्लेक्स बोर्ड, प्रात्यक्षिक) पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती व हायड्रोपोनिक्स प्रात्यक्षिक, मलबेरी व टसर प्रात्यक्षिक व माहिती, मधमाशी पालन प्रात्यक्षिक, ठिंबक व तुषार सिंचन प्रात्यक्षिक यासारखे विविध शेतकरी उपयोगी स्टॉल प्रदर्शनीमध्ये उपलब्ध राहील. या प्रदर्शनीमध्ये विविध विषयावर १८ तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. (शहर प्रतिनिधी)

बसेसची व्यवस्था
जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळमार्फत मुल, पोंभूर्णा, बल्लारपूर, बागला चौक, वरोरा, राजूरा, गडचांदूर, घुग्गुस येथून सकाळी ७.३० व ८.३० वाजता व सांयकाळी ५.३० व ७ वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Web Title: The Water Council encourages agricultural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.